‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ ही लोकप्रिय मालिका कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात पोहोचले आहे. जयदीप आणि गौरीची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. दरम्यान, नुकत्याच एका एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलबरोबर बोलताना जयदीप म्हणजे अभिनेता मंदार जाधवने त्याच्या साखरपुड्याचा रंजक किस्सा सांगितला.

‘अल्ट्रा मराठी बज’ या एंटरटेन्मेंट यूट्युब चॅनेलवरील ‘फोटोमागची गोष्ट’ या सेग्मेंटमध्ये मंदार जाधव सहभागी झाला होता. या सेग्मेंटमध्ये त्याला त्याचे जुने काही फोटो दाखवण्यात आले आणि त्या फोटोमागची गोष्ट सांगायची होती. यावेळी त्याला पत्नी मितिकाबरोबरचाही एक फोटो दाखवण्यात आला.

readers reaction on different lokrang articles
पडसाद : हा तर बुद्धिभेद
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
raj Rajshekhar emotional letter written to grandfather Rajshekhar
“प्रिय आजोबा…”, मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध खलनायक राजशेखर यांच्या नातवाने लिहिलं भावुक पत्र, म्हणाला…
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
नाव घेतले तर न्यायाल्यात खेचीन ‘ कोणी ‘ पाठविली शरद पवार यांना नोटीस !
Father daughter kanyadan emotional video goes viral father daughter bonding video
“हा क्षण का असतो मुलींच्या आयुष्यात?” लग्न ठरलेल्या प्रत्येक मुलीनं आणि तिच्या वडिलांनी पाहावा असा VIDEO
Mankhurd  Shivajinagar Muslim community in confusion print politics news
मानखुर्द- शिवाजीनगरात मुस्लीम समाज संभ्रमात
narendra modi akola public rally
मोदींच्या सभेसाठी अकोल्यात जय्यत तयारी; काय बोलणार याकडे लक्ष?

हेही वाचा – शरद पोंक्षे यांनी सोनाली कुलकर्णीची मागितली होती माफी, खुलासा करत म्हणाले…

त्यानंतर त्या फोटोविषयी मंदार म्हणाला, “हा फोटो माझ्या साखरपुड्याचा आहे. माझा साखरपुडा लोणावळ्याला झाला होता. या फोटोमागची तुम्हाला कहाणी सांगतो; जी खूप रंजक आहे. माझे आई-बाबा मितिकाला भेटले होते. एके दिवशी तिचे आई-बाबा हरिद्वारवरून लोणावळ्याला एका लग्नासाठी आले होते. यावेळी मुंबईत त्यांचं येणं झालं नाही. थेट दुसरं विमान पकडून ते लोणावळ्याला गेले. ते मितिकाच्या बहिणीच्या कोणाचं तरी असं लग्न होतं. तर, मितिकानं मला सांगितलं की, ही चांगली संधी आहे. आपल्या दोघांच्या कुटुंबीयांना लग्नाच्या निमित्तानं एकमेकांना भेटता येईल. तू तुझ्या कुटुंबाला घेऊन तिथे ये. तर मी म्हटलं की, ठीक आहे. मी येतो सगळ्यांना घेऊन.”

हेही वाचा – “…म्हणून मी कॅन्सरची लढाई जिंकलो”, शरद पोंक्षेंनी सांगितलं कारण; म्हणाले, “बांगलादेशी मुलीने…”

“मग ज्याचं लग्न होतं, त्याच्या लग्नात आमचा साखरपुडा झाला. फ्री ऑफ कॉस्टमध्ये साखरपुडा झाला. एवढंच नाही तर ज्याचं लग्न होतं, ते नवरा-नवरी आमच्या साखपुड्याच्या फोटोमध्ये आमच्या मागे उभे आहेत. आम्ही त्यांच्या लग्नात जाऊन आमचा साखरपुडा उरकला होता. तेव्हाचा हा फोटो आहे.”

पुढे मंदार म्हणाला, “त्या दिवशी साखरपुड्याचं काहीही नियोजन नव्हतं. फक्त आमच्या दोघांचं कुटुंब एकमेकांना भेटायला आलं होतं. पण, नंतर त्यांना वाटलं असेल की, याच्याहून अजून काही चांगलं असूच शकत नाही. म्हणजेच मुलाला याच्यापेक्षा चांगली मुलगी आणि मुलीला याच्यापेक्षा चांगला मुलगा भेटूच शकत नाही. त्यामुळे इथेच आपण दोघांचा साखरपुडा करून टाकू या. मग लगेच दोनतीन तासांत दोघांच्या अंगठ्यांची सोय केली आणि आमचा साखरपुडा झाला.”

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबबरोबर अफेअरच्या चर्चा, निमिषने सोडलं मौन; म्हणाला, “आम्ही…”

हेही वाचा – Video: पावभाजी आणि फूड ट्रकनंतर आता ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम सुप्रिया पाठारे लवकरच घेऊन येतायत…

दरम्यान, मंदारने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ या मालिकेपूर्वी अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. तसेच त्याची पत्नी मितिशा शर्मा-जाधव हीदेखील हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.