‘सुख म्हणजे काय असतं’ ही मालिका गेली ३ वर्ष छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. १७ ऑगस्ट २०२० रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. यामध्ये अभिनेत्री गिरीजा प्रभू व अभिनेता मंदार जाधव यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी साकारलेल्या गौरी-जयदीप या पात्रांना प्रेक्षकांनी अल्पावधीतच पसंती दिली. याशिवाय या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारणाऱ्या माधवी निमकरनेही घराघरांत विशेष लोकप्रियता मिळवली आहे.

हेही वाचा : “त्यांच्या शेजारी उभं राहण्याची…”, ‘बिग बीं’च्या वाढदिवसानिमित्त रितेश देशमुखने शेअर केला Unseen फोटो

‘सुख म्हणजे काय असतं’ या मालिकेतील मुख्य नायक-नायिकेप्रमाणे शालिनी सुद्धा घरोघरी लोकप्रिय आहे. मालिकेत गौरी आणि जयदीपचा शालिनी सतत छळ करत असल्याचं पाहायला मिळतं. गेल्या आठवड्यात प्रसारित झालेल्या भागामध्ये शालिनीच्या वाढदिवसाला गौरी-जयदीप तिच्या कारस्थानांचा पर्दाफाश करताना दाखवण्यात आलं. यानंतर मालिकेत शालिनी सर्वांशी प्रेमाने चांगलं वागत असल्याचं दिसत आहे. परंतु, ती मालिकेमधील मुख्य खलनायिका असल्याने एवढ्यात शालिनी सुधारणार नाही असा अंदाज प्रेक्षकांकडून वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा : “सुखाचा प्रवास कसा होईल?” वाहतूक कोंडीमुळे त्रस्त झालेल्या नम्रता संभेरावची संतप्त पोस्ट; म्हणाली…

शालिनीने नुकताच मालिकेच्या आगामी भागाचा BTS व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्री जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. लक्ष्मीला गुंडांपासून वाचवण्यासाठी शालिनी शेवटपर्यंत लढा देते तसेच गुंडाना लाथा-बुक्क्यांनी आणि दगडाने मारते असं या BTS व्हिडीओमध्ये दिसतंय. अभिनेत्रीने शेअर केलेल्या या पडद्यामागच्या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

हेही वाचा : विमानात अभिनेत्रीबरोबर घडला धक्कादायक प्रकार, मद्यधुंद सहप्रवाशाने केलं गैरवर्तन, पोस्ट शेअर करत म्हणाली…

अभिनेत्री माधवी निमकरने या व्हिडीओला ‘कष्ट केल्यावरचं तुम्हाला कष्ट काय असतात याची जाणीव होते’ असं कॅप्शन दिलं आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत अभिनेत्रीचं कौतुक केलं आहे. “काय तो आत्मविश्वास, काय तो राग, काय ती एनर्जी, काय ती लाथ ओके मध्ये हाय”, “अशी खलनायिका पुन्हा नाही होणार”, “शालिनी खऱ्या अर्थाने हुशार, स्मार्ट दाखवली आहे. “तिला सगळ्यातील ज्ञान आहे फक्त तिचं पात्र निगेटिव्ह आहे.” अशा कमेंट्स तिने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Story img Loader