गेल्या काही दिवसांपासून ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ चांगलीच चर्चेत आहे. नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका टीआरपीच्या यादीत देखील पहिल्या पाचमध्ये ठाण मांडून आहे. पण दुसऱ्या बाजूला प्रेक्षक वर्ग मालिका बंद करण्याची मागणी करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मालिकेचा एक प्रोमो ट्रोल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा मालिकेचा नवा प्रोमो ट्रोल झाला असून प्रेक्षकांनी रोष व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ‘बिग बॉस’च्या आठवणीत रमली ‘तुझेच मी गीत गात आहे’ फेम तेजस्विनी लोणारी, म्हणाली, “मैलाच्या दगडासारखा…”

मालिकेत काही दिवसांपूर्वी शालिनीच्या वाढदिवसा दिवशी तिचा पर्दाफाश होताना दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे तिला माईंनी जयदीप आणि गौरीची गुडघ्यावर बसून नाक घासून माफी मागायची, असं सांगितलं होतं. एवढंच नाही तर शालिनीच्या गळ्यात एक पाटी घालून तिची धिंड काढली होती. या पाटीवर “घराशी बेईमानी करणारी, मी एक नालायक सून” असा मजकूर लिहीलेला होता. या सगळ्या प्रकारानंतर आता शालिनी टोकाचं पाऊल उचलताना पाहायला मिळणार आहे. याचाच प्रोमो स्टार प्रवाहच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

या प्रोमोमध्ये, शालिनी गळफास लावण्यासाठी टेबलवर चढलेली पाहायला मिळत आहे. पण तितक्यात गौरी येते आणि शालिनी वाहिनी अशी जोरात हाक मारताना दिसत आहे. आता खरंच गौरी शालिनीचा जीव वाचवू शकणार का? हे येत्या काळात समजेल. परंतु मालिकेचा हा नवा प्रोमो पाहून प्रेक्षक वैतागले आहेत.

हेही वाचा- Soha Ali Khan Birthday: वडिलांच्या भीतीमुळे बँकेत नोकरी ते बॉलीवूडमध्ये पदार्पण, असा आहे सोहा अली खानचा प्रवास

हेही वाचा – ‘आई कुठे काय करते’ फेम रुपाली भोसलेला झाला मोठा आनंद, कारण…

एका नेटकरीनं लिहीलं आहे की, “आता तो गळफास प्रेक्षकांनी स्वतःच्या गळ्यात बांधून घेणं राहीलं आहे.” तसेच दुसऱ्या नेटकरीनं लिहीलं आहे की, “काय फालतूपणा आहे हा.” तर तिसऱ्या नेटकरीनं लिहीलं आहे की, “नको नको शालिनी…तू नको गळफास लावू… आम्हा प्रेक्षकांवर या गौरी आणि या मालिकेने ती वेळ आणली आहे… आम्ही लावतो गळफास… पण या नौटंकी गौरीला … (उगाच या फालतू मालिकेसाठी आम्ही का जीव देऊ?)” चौथ्या नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, “तरीच म्हटलं गौरीचा खुळेपणा अजून कसा आला नाही? आता जीव वाचवेल आणि नंतर मग शालिनीने काही केलं की रडत बसेल.. कोठारे व्हिजन गौरी चांगली आहे हे आम्हाला कळलं आहे बस करा आता एवढा चांगुलपणा..”

हेही वाचा – Video: अखेर क्रांती आणि समीर वानखेडेंच्या जुळ्या मुलींची पहिली झलक समोर; अभिनेत्रीने शेअर केला गोड व्हिडीओ

दरम्यान, ‘स्टार प्रवाह’वर लवकरच ‘आता होऊ दे धिंगाणा’ हा कार्यक्रम सुरू होणार आहे. तसेच अक्षर कोठारीची नवी मालिका भेटीस येणार असल्याचं निश्चित झालं आहे. पण ही नवी मालिका कधी सुरू होणार? आणि कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे येत्या काळातच समजेल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sukh mhanje nakki kay asta marathi serial again troll audience annoyed reaction pps