‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. कारण मालिकेत आता मोठं वळणं येणार आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेची कथा २५ वर्ष पुढील दाखवणार आहेत. गौरी-जयदीपच्या पुनर्जन्माची कथा २० नोव्हेंबरपासून रात्री १० वाजता पाहायला मिळणार आहे. याचा नवा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून मालिकेला ट्रोल केलं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ‘रमा राघव’ मालिकेतील अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा; फोटो अन् व्हिडीओ झाले व्हायरल

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका २५ वर्षांची लीप घेणार आहे. आता मालिकेत जयदीपचा अधिराज म्हणून पुनर्जन्म होणार आहे, तर गौरीचा नित्या म्हणून पुनर्जन्म पाहायला मिळणार आहे. मालिकेतील हे मोठं वळणं काही प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं आहे. तर काही प्रेक्षकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “संपवा रे मालिका आता”, “नको…बसं करा आता..हात जोडते…”, “याला छळ म्हणतात”, “फालतू मालिका”, “भिकेचे डोहाळे” अशा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया मालिकेच्या नव्या प्रोमोवर उमटत आहेत.

हेही वाचा – Video: ‘ये रिश्ता क्या कहलाता है’मधील लोकप्रिय अभिनेत्याची ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत एंट्री; पाहायला मिळणार महत्त्वाच्या भूमिकेत

मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये सुरुवातीला माई मशाल हाती घेऊन अंबाईच्या मंदिरात जाताना दिसत आहेत. त्यानंतर माई मंदिरात जाऊन जयदीप व गौरीच्या पुनर्जन्मासाठी साकडं घालताना पाहायला मिळत आहेत. त्या म्हणणात, “डोळे उघडं अंबाई. डोळे उघडं. २५ वर्ष झोपलीस गं तू. माझ्या जयदीप-गौरीवर अन्याय झाला. त्या निरागस जीवाचा अंत झाला. तू असशील सत्वाची तर घडवशील चमत्कार अन् देशील माझ्या जयदीपला जन्म नवा. व्हय तू काळ भेदून आणशील माझ्या गौरीला पुन्हा या भूमीवर अन् करशील सफल त्यांची अधुरी प्रेम कहाणी. जाग अंबे, जाग…” या प्रोमोमध्ये जयदीप म्हणजेच अधिराज रांगडा शेतकऱ्याच्या रुपात दिसत आहे. तर गावंढळ गौरी सुशिक्षित नित्याच्या रुपात पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – विराट कोहलीने केलं ४९वे वनडे शतक; अनुष्का शर्माचा आनंद गगनात मावेना, म्हणाली, “स्वतःच्या वाढदिवसाला…”

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या या नव्या प्रोमोवर एका नेटकऱ्याने लिहीलं, “अंबाबाईने खरंच उठून खाली यावं आणि या सगळ्यांच्या एकेक मुस्काडीत मारावी… भिकार, फालतू, दळभद्री… २५ वर्षानंतरही जयदीप असो किंवा नाव बदललेला कोणीतरी असो, त्याचं बोलणं रोबोट सारखंच राहणार…कीव करण्यालायक लेखक…” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहीलं, “अरे यार नको रे यांचा पुनर्जन्म वगैरे. तेच तेच रडगाण पुन्हा पुन्हा नाही बघायचंय” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहीलं, “जगबुडी होईल पण ही मालिका काही संपणार नाही…”

हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीने गायली श्रेया घोषालने गायलेली अंगाई, कलाकार मंडळीसह चाहत्यांनी केलं कौतुक

दरम्यान, २० नोव्हेंबरपासून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेच्या सध्याच्या वेळेत म्हणजेच रात्री ९.३० वाजता ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ प्रसारित होणार आहे. या मालिकेत ईशा केसकर, अक्षर कोठारी, किशोरी अंबिये, दीपाली पानसरे असे अनेक कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sukh mhanje nakki kay asta new promo troll audience demand off air this serial pps