मालिका आणि प्रेक्षक यांचं एक वेगळं नातं असतं. दररोजच्या मनोरंजनासाठी प्रेक्षक त्यांच्या आवडीच्या मालिका आवर्जुन न चुकता पाहत असतात. त्यामुळे मालिका या लोकप्रिय ठरतात. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट होतं असतात. पण हेच ट्विस्ट काही वेळेला महागात पडू शकतात. त्यानुसार अलीकडचं उदाहरण म्हणजे ‘अबोली’ मालिका. या मालिकेत काही दिवसांपूर्वी तिरडीवर झोपलेल्या अबोलीनं थेट अर्जुनचा हात पकडल्याचं दाखवलं होतं. याचा प्रोमो पाहून प्रेक्षक वर्गात खूप नाराजी पसरली होती. प्रेक्षकांनी या प्रोमोवर जोरदार टीका केली होती. आता असं काहीस ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या नुकत्याच आलेल्या प्रोमोबरोबर घडलं आहे.

हेही वाचा – ‘रंग माझा वेगळा’ फेम रेश्मा शिंदेसाठी संपूर्ण मालिकेतील ‘हा’ सीन होता चॅलेजिंग; म्हणाली, “मला रात्री…”

china wuhan lab new nasal vaccine
जिथून करोना पसरला त्याच वुहान प्रयोगशाळेत तयार झाली लसीची मात्रा, काय आहे याचं महत्त्व?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Bollywood actress Kriti Sanon like do you also feel not wanting people around if your mood is off
क्रिती सेनॉनप्रमाणे तुम्हालाही मूड ऑफ असेल तेव्हा लोक जवळ नको असतात? जाणून घ्या, भावनिकदृष्ट्या स्वत:ची काळजी कशी घ्यावी?
Indian society, Ramayana, Mahabharata, positive ideals, negative tendencies, Rama, Krishna, Ravana, Duryodhana, social consciousness, judicial system, cultural influence,
रावणाच्या मर्यादांची प्रतिष्ठापना आज आवश्यक आहे…
a man saved dogs life | dog lovers
याला म्हणतात खरी माणुसकी! स्वतःचा जीव धोक्यात टाकून वाचवले कुत्र्याचे प्राण, व्हिडिओ होतोय व्हायरल
Rahu-Ketu will change the sign in 2025
बक्कळ पैसा! २०२५ मध्ये राहू-केतू करणार राशी परिवर्तन; ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार मालामाल
Rape on Minor Girl
Crime News : “मावशी, बलात्कार म्हणजे काय?”, अल्पवयीन पीडितेने सामूहिक बलात्काराच्या दोन दिवस आधी विचारला होता प्रश्न
husband is younger than the wife chatura article
स्त्री आरोग्य: पती पत्नीपेक्षा वयाने लहान असेल तर?

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचा नवा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ‘काय फालतूगिरी लावली आहे’, ‘आता खूपच अती झालंय’, ‘मालिका बंद करा’, ”रंग माझा वेगळा’ या मालिकेपेक्षा ही फालतू मालिका आहे’, अशा प्रकारच्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेच्या नव्या प्रोमोवर आल्या आहेत.

हेही वाचा – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ‘जलसा’वर; अमिताभ बच्चन यांना बांधली राखी, म्हणाल्या, “भारतातील…”

या नव्या प्रोमोमध्ये शालिनीचा नवा डाव पाहायला मिळत आहे. शालिनी, देवकी आणि मल्हार जयदीप एका ठिकाणी घेऊन जाऊन त्याला खड्डात पुरताना दिसत आहेत. यावेळी शालिनी मनातल्या मनात म्हणते की, ‘या टाइमला नशीबाने मला साथ दिली गौरी. जयदीप भावपूर्ण श्रद्धांजली तुला.’ तर दुसऱ्या बाजूला जयदीपच्या शोधात असलेली गौरी गणपती बाप्पाकडे हात जोडून प्रार्थना करताना दिसत आहे. ती म्हणते की, ‘बाप्पा जयदीपला माझ्यापासून कुठेही घेऊन जाऊ नकोस.’ तितक्यात गौरी जयदीपला ज्या ठिकाणी पुरलं असतं तिथे पडते आणि तिचं मंगळसूत्रही तिथेच पडतं. यावेळी गौरीला एक छोटी मुलगी येऊन म्हणते की, ‘बाप्पाचा उंदीर मामा मार्ग दाखवायला आहे. उंदीर मामा तुचं गौरीला आता मार्ग दाखवं बरं.’ तेवढ्यात एक छोटा पांढरा उंदीर येतो. हाच नवा प्रोमो पाहून प्रेक्षक हैराण झाले आहेत.

हेही वाचा – बिग बॉस विजेती मेघा धाडेची भाजपाच्या ‘या’ पदी नियुक्ती; म्हणाली, “मला…”

हेही वाचा – कुणी म्हणाले वेडे, तर कुणी म्हणाले प्रेरणादायी; अविनाश आणि ऐश्वर्या नारकर यांच्या नव्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…

एका नेटकऱ्यानं लिहीलं की, ‘अरे काय ही मालिका… किती वेळा जयदीप मरतो आणि किती वेळा जीवंत होतो…फालतू.’ तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं आहे की, ‘तुमच्या मालिकेचा लेखक कुठे आहे? त्याचे पाय धरावेसे वाटतायत. देवाला पण नाही सोडत. ‘रंग माझा वेगळा’पेक्षा ही जास्त फालतू मालिका आहे. आता ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेनंतर हिचा नंबर बंद करण्यासाठी प्लिज लावा आणि आमच्यावर फार मोठे उपकार करा.’ तसेच तिसऱ्या नेटकरीनं लिहीलं आहे की, ‘कदाचित या मालिकेमधील लोकांना काम मिळत नसतील म्हणून ही मालिका चालू ठेवली आहे, असं वाटतंय. कारण एवढ्या घान मालिकेत हे सगळे बिनडोक काम करत आहेत. अर्थहीन मालिका आहे.’

हेही वाचा – “किती काळ काठावर उभं राहून…” बिग बॉस फेम अभिनेत्यानं भाजपमध्ये केला जाहीर प्रवेश; म्हणाला…

दरम्यान, ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या जागी तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ४ ऑगस्टपासून ही मालिका संध्याकाळी ८ वाजता पाहायला मिळणार आहे.