कलाकार व चाहत्यांचे नाते काही वेगळेच असते. कलाकारांच्या कलाकृती, अभिनय यावर प्रभावित होत चाहते तयार होतात. चाहते स्वत:च्या आवडत्या कलाकारांप्रति विविध माध्यमांतून प्रेम व्यक्त करताना दिसतात. कधी आवडत्या कलाकारासारखी केसांची स्टाइल करतात, कधी त्यांच्या चित्रपटांचे पोस्टर किंवा कलाकारांचे फोटो जपून ठेवतात; तर कधी काही चाहते त्यांना विविध भेटवस्तू देतात. अशा अनेकविध माध्यमांतून चाहते त्यांचे प्रेम व्यक्त करताना दिसतात. आता अभिनेत्री माधवी निमकरच्या एका चाहतीने तिच्यासाठी असे काही केले आहे, ते पाहिल्यानंतर अभिनेत्रीने याबद्दल पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अभिनेत्रीसाठी चाहतीने केली खास गोष्ट

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’फेम अभिनेत्री माधवी निमकरने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये माधवी निमकरबरोबर एक मुलगीही दिसत आहे. माधवी त्या मुलीच्या हातावरील टॅटू दाखवते. त्यानंतर ती त्या मुलीच्या गालावर किस करताना दिसत आहे. दोघीही आनंदित असल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. त्या मुलीच्या हातावर जो टॅटू आहे तो माधवीच्या नावाचा आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले, “प्रिया काय बोलू मी? अतिशय महत्त्वाचा क्षण आहे माझ्यासाठी, माय बेस्ट फॅनमोमेंट. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत आमच्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेवर, माझ्यावर खूप प्रेम केलंस. येताना खूप भेटवस्तू आणतेस. दरवर्षी माझ्या वाढदिवसाला घरी केक पाठवतेस. आता तर माझ्या नावाचा परमनंट टॅटू काढलास. तुझ्या प्रेमाबद्दल खूप धन्यवाद प्रिया आणि तुझं प्रेम बिनशर्त आहे, म्हणून तू खास आहेस”, असे म्हणत अभिनेत्रीने तिच्या चाहतीचे आभार मानले आहेत.

actress Shobitha Shivanna suicide
अभिनेत्री शोभिता आढळली मृतावस्थेत, राहत्या घरी संपवलं आयुष्य
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: जागतिक महासत्तेच्या चाव्या पुन्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताब्यात; अमेरिकेत मोठ्या विजयासह सत्तारूढ होणार!
Devendra Fadnavis vs Sanjay Raut
“…अन्यथा आम्ही आमचं पुस्तक उघडू”, राऊतांचा महायुतीला इशारा; म्हणाले, “भाजपा मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांऐवजी…”
US Presidential Election Results 2024 Live Updates in Marathi| Donald Trump vs Kamala Harris Live
US Election Results 2024 : कमला हॅरीस यांचा पराभव, रात्रीचं भाषणही रद्द!
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
vishakha subhedar son made besanache ladoo for first time
विशाखा सुभेदारच्या परदेशी गेलेल्या लेकाने पहिल्यांदाच बनवले लाडू! अभिनेत्रीच्या डोळ्यात आनंदाश्रू; म्हणाली, “मी घरी नसूनही…”

अभिनेत्रीने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने म्हटले, “अभिनय तर तू खूप छान करतेसच. तितकीच तू छान व्यक्ती आहेस. प्रेमळ मनमिळाऊ आणि सुंदर. अशीच राहा.” दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटले, “आपण जे प्रेम देतो ते मनापासून आहे, हे याचं उत्तर आहे.” आणखी एका नेटकऱ्याने अभिनेत्रीला टॅग करत म्हटले, “तुम्ही या इंडस्ट्रीमधील कमाल अभिनेत्री आहात, म्हणून तर चाहते तुमच्यावर अतोनात प्रेम करतात. तुमच्या कामावरसुद्धा भरपूर प्रेम करतात, असेच काम करत राहा, खूप छान”, असे म्हणत अनेक नेटकऱ्यांनी अभिनेत्रीचे कौतुक केले आहे. तर अनेकांनी तिच्या चाहतीचेदेखील कौतुक केल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा: “मला शांत झोप लागत नव्हती…”, विक्रांत मॅसीने महिन्याला ३५ लाख रुपये मिळत असूनही सोडलेलं टीव्हीवरील काम

दरम्यान, अभिनेत्री माधवी निमकरने अनेक मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सध्या ती ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत काम करताना दिसत आहे. या मालिकेत तिने खलनायिकेची भूमिका साकारली आहे. मात्र, तिने साकारलेल्या भूमिकेचे, तिच्या अभिनयाचे वेळोवेळी कौतुक होताना दिसते. सोशल मीडियावरदेखील अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग आहे. आता लवकरच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.