सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत सध्या मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शालिनीने नित्याला त्रास देण्यासाठी थेट राजमाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजमाचा जीव वाचवण्यासाठी पावनी मध्ये आली आणि शालिनीने पावनीवर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात पावनीचा मृत्यू झाला आहे. शालिनीच्या या त्रासाला कंटाळून तिला शिक्षा व्हावी यासाठी नित्या आणि अधिराज प्रयत्न करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

त्यात आता मालिकेच्या पुढील भागाचा एक प्रोमो समोर आला आहे. यामध्ये चक्क शालिनीची प्रत्येक गोष्ट ऐकणारा सोमनाथ शालिनीविरोधात उभा राहिला आहे. तो थेट शालिनीवर बंदुक उगारतो आणि एक गोळीदेखील झाडतो, असं प्रोमोमध्ये दिसत आहे. शालिनीला तिच्या चुकांची योग्य ती शिक्षा मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे. त्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा : इजिप्तच्या लॉगिना सलाहने रचला इतिहास; त्वचारोग असूनही मिस युनिव्हर्स स्पर्धेत केली चमकदार कामगिरी

मालिकेच्या व्हायरल होत असलेल्या प्रोमो व्हिडीमध्ये दिसत आहे की, नित्या, अधिराज आणि सावरी एकत्र त्यांच्या घराबाहेर बसले आहेत. येथे एकत्र येत सर्वजण शालिनीला तिच्या चुकांची शिक्षा व्हावी यासाठी काय केले पाहिजे यावर विचार करत आहेत. तितक्यात सावरी अधिराजला म्हणते, ” तुला जे योग्य वाटतं ते तू कर, बाकीचं सगळं देवी आईवर सोपव.” त्यावर अधिराज म्हणतो, ” चालेल, मी तसंच करतो. त्या शालिनीला आपण मरणाच्या दारात उभं करायचं.”

त्यानंतर पुढे प्रोमोमध्ये सोमनाथ आणि शालिनी दिसत आहेत. येथे सोमनाथ शालिनीवर बंदुक रोखून उभा आहे. त्याला पाहून शालिनी अजिबात घाबरत नाही. ती उलट त्याला मोठ्याने ओरडून सांगते मार मला. तिच्या आवाजाने सोमनाथ थोडा खाबरतो आणि त्याच्या हातून बंदुकीची गोळी सुटते.” असे प्रोमोमध्ये दिसत आहे. आता शालिनीचा खरोखर मृत्यू होणार का हे पुढील भागात समजणार आहे.

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका बंद होणार

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं आहे. साल २०२० पासून ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू आहे. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. मालिका सुरू झाली तेव्हा ती टीआरपीच्या शर्यतीत नेहमी टॉप ५ मध्ये असायची. त्यानंतर आता देखील मालिकेने टॉप १० मध्ये आपलं स्थान कायम ठेवलं आहे.

“महादेव जोपर्यंत बोलवत नाहीत…” शिल्पा शेट्टी पतीबरोबर पोहोचली महाकालेश्वरला; देवाकडे मागितली ‘ही’ महत्त्वाची गोष्ट

या मालिकेत मुख्य खलनायीका शालिनी हे पात्र अभिनेत्री माधवी निमकर साकारत आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये शालिनीचा मृत्यू होणार असं दाखवण्यात आलं आहे. शालिनीचा मृत्यू झाल्यानंतर लगेचच मालिका संपेल अशी शक्यता आहे.