‘बिग बॉस १६’ या शोमधील काही स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. हा शो संपल्यानंतर शिव ठाकरे, एमसी स्टॅन, अर्चना गौतम सारख्या स्पर्धकांचं नशिबच बदललं. त्यातील एक कलाकार म्हणजे अभिनेत्री सुम्बुल तौकिर खान. सुम्बुलचा या घरातील प्रवास चर्चेचा विषय ठरला. सुरुवातीच्या दिवसांमध्ये शालीन भानोतवरुन तिच्यावर टीका करण्यात आली आली. पण नंतर आपली चूक सुधारत सुम्बुल उत्तम खेळ खेळली.

आणखी वाचा – ‘बिग बॉस १६’चं विजेतेपद पटकावल्यानंतर एमसी स्टॅनचं पुण्यात पहिलं कॉन्सर्ट, एका तिकिटाची किंमत आहे तब्बल…

सुम्बुल आता तिला मिळालेलं यश एण्जॉय करताना दिसत आहे. तिने सोशल मीडियाद्वारे खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. सुम्बुलचं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं आहे. तिने मुंबईमध्ये स्वतःचं आलिशान घर खरेदी केलं आहे. तिने या नव्या घरात कुटुंबिय तसेच जवळच्या मित्र मंडळींसाठी खास पार्टीचं आयोजन केलं होतं.

आणखी वाचा – Photos : १९व्या वर्षीच सुम्बुल तौकीर खानने मुंबईमध्ये खरेदी केलं आलिशान घर, नव्या घरात जंगी पार्टी, पाहा Inside Photos

या पार्टीला शिव ठाकरे, निमृत कौर, साजिद खान तसेच इतर कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. शिवने त्यानंतर सुम्बुलसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. शिवने सुम्बुलबरोबरचा फोटो शेअर केला आहे. तो म्हणाला, “सुम्बुल नवीन घरासाठी तुझं खूप अभिनंदन”.

आणखी वाचा – प्राजक्ता माळीचा पुण्यामध्ये आहे ‘हा’ व्यवसाय, अभिनेत्रीने पहिल्यांदाच केला खुलासा, म्हणाली, “अजूनही…”

“मुंबईमध्ये नवीन घर विकत घेण्यासाठी लोकांचं आयुष्य निघून जातं. आणि तू तर बालपणातच घर खरेदी केलं”. असं शिवने मजेशीर अंदाजात म्हटलं आहे. ‘बिग बॉस’च्या घरामध्ये शिव व सुम्बुलमध्ये उत्तम मैत्री जमली होती. या दोघांची मैत्री घराबाहेरही कायम आहे. शिवाय काही पार्ट्यांमध्ये शिव व सुम्बुलचे एकत्रित धमाल व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले.