छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका इमली व नंतर बिग बॉस १६ मधून लोकप्रिय झालेली सुंबुल तौकीर खान कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सुंबुल अवघ्या १९ वर्षांची आहे आणि ती वडिलांच्या खूप जवळची आहे. सुंबुल आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी मुलाखतीत सांगत असते. आता तिने पहिल्यांदा पाळी आली, तेव्हाचा अनुभव सांगितला आहे.
‘ई-टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, सुंबुल तौकीरने खान म्हणाली, “मी स्वतःला खूप भाग्यवान समजते, माझे वडील खूप समजूतदार आहेत. मी ६ वर्षांची होते, तेव्हापासून त्यांनी माझी काळजी घ्यायला सुरुवात केली. त्यांनी एकट्यांनी आम्हाला वाढवलं. ते सर्व काम स्वतः करायचे. आम्हाला सकाळी झोपेतून उठवण्यापासून ते शाळेत जाण्यास तयारही तेच करायचे. ते आमच्या आधी उठायचे आणि आमच्यासाठी नाश्ता बनवायचे, घर सांभाळायचे, स्वतःची डान्स स्कूल चालवायचे. त्यांनी सर्व काही स्वतः केलंय.”
“मुलींनी लग्नाआधी शरीरसंबंध…”; रेखा यांच्या सेक्ससंबंधी वक्तव्याने उडालेली खळबळ
सुंबुल पुढे म्हणाली, “माझ्या वडिलांसमोर काही आव्हाने होती. मुलीचे पिता असल्याने मुलीचं वय वाढू लागलं की तिला समजून घेण्याचे आणि मुलीला शारीरिक बदलांबद्दल समजावून सांगण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले. माझ्या वडिलांनीच मला पहिल्यांदा मासिक पाळीबद्दल माहिती दिली होती. शिवाय पाळी आल्यावर काय करायला हवं, तेही त्यांनीच सांगितलं होतं.”
“आतापर्यंत मला माझ्या आयुष्यात कोणाचाही आधार किंवा मार्गदर्शन मिळालेले नाही. जेव्हा मला पहिल्यांदा मासिक पाळी आली तेव्हा इतर कोणीही नव्हते, माझ्या वडिलांनी मला त्याबद्दल समजावून सांगितले. त्यावेळी मला मार्गदर्शन करायला माझ्या आजूबाजूला कोणीच नव्हते. त्यांनीच मला मदत केली. माझ्या वडिलांना माझ्याबद्दल आणि माझ्या आयुष्याबद्दल सर्व काही माहीत आहे,” असं सुंबुल म्हणाली.