कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेला महाराष्ट्रभरातून भरभरून प्रेम मिळत आहे. गेल्या पाच वर्षांत या मालिकेतील प्रत्येक कलाकाराला प्रेक्षकांनी आपलंस केलं आहे. विशेषत: बाळूमामांची भूमिका साकारणाऱ्या सुमीत पुसावळेला या भूमिकेमुळे सर्वत्र एक वेगळी ओळख मिळाली. २०१८ मध्ये ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला होता. मात्र, आता या मालिकेत लवकरच मोठा बदल होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’मध्ये बाळूमामांची भूमिका साकारणाऱ्या सुमीत पुसावळेने या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. मालिका सोडताना सोशल मीडियावर अभिनेत्याने भावुक पोस्ट शेअर केली आहे. आता सुमीतने मालिका सोडल्यावर या भूमिकेसाठी कोणाची वर्णी लागणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

हेही वाचा : “मी फक्त रडत होते”, ‘सिम्बा’ पाहिल्यावर मराठमोळ्या वैदेही परशुरामीला तब्बूने केलेला फोन, अभिनेत्री म्हणाली…

सुमीत पुसावळेची पोस्ट

बाळूमामाच्या नावानं चांगभलं.

नमस्कार,

मी सुमित पुसावळे, खरं तर ही ओळख ‘बाळुमामा’ या नावा व्यतिरिक्त लगेच नाही होत आणि त्याच कारण तर तुम्हाला माहिती आहेच. बोलण्यासारखं, लिहिण्यासारखं खूप काही आहे.

आजही बाळुमामाच्या नावानं चांगभलं सिरीयलच्या सेटवरचा योगायोगाने गेलो होतो तो दिवस आठवतोय, योगायोगाने आणि पुढच्या काही दिवसातच बाळूमामांच्या रोलसाठी बोलावणं आलं आणि माझ्या आयुष्यात नवीन पर्व सुरु झालं. बाळूमामांच्या सेवेत रुजू झालो.

सगळ्यात आधी या मालिकेचे निर्माते संतोष अयाचित सर यांचे मनापासून आभार. मला, सुमित पुसावळेला एक वेगळी ओळख दिली. ही ओळख आयुष्यभरासाठी राहील असं काम माझ्याकडून करून घेतलंत. निखिल साने सर, दीपक राजध्यक्ष सर, विराज राजे सर, केदार शिंदे सर.
तसंच स्नेहल, गायत्री, अली भाई, साई सर, प्रज्ञा, कलर्स मराठी प्रोमो टीम, राहुल सर, गणेश सर आणि इतर सर्व कलर्स मराठी टीम यांचे मनापासून आभार, वेळोवेळी माझ्या कामाच्या कौतुक करून मला प्रोत्साहन दिलं.

मालिकेचे दिग्दर्शक केदार सर, D.O.P. रुपेश सर, आशिष भाई, माझा उत्तम मेकअप करणारे राजेश दादा आणि त्याची संपूर्ण टीम, संकेत, प्रसाद, विकी, मयूर, शुभम, रोहन दा, मला बाळुमामाच्या रूपात आणण्यासाठी आमची वेशभूषा टीम, राजेश, पिनाकी दादा, राजेश, सतीश, उपेंदर, संतोष दादा. सेटिंग टीम मारुती दादा, बाबा दादा, संतोष दादा, सावंत मामा. लाईट टीम दया भाई, पांडेजी, अनिस भाई, महेंदर भाई, आणि इतर टीम मेंबर, ट्रॉली टीम सतीश, कॅमेरा टीम सुभाष, गुड्डू भैय्या, अख्खी डायरेकशन टीम, प्राची मॅडम. संपूर्ण प्रोडक्शन टीम, ओंकार,प्रवीण, संदीप, सुमित, प्रेम, विशाल सर, लोकेश दादा. एडिट टीम चे गणेश दादा आणि त्यांची संपूर्ण टीम, स्पॉट टीम जय, अरविंद, रघु, किसना, अनिरुद्ध, सनी. आणि माझ्याबरोबरचे हजारो कलाकार तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.

मायबाप प्रेक्षकांनो तुम्ही केलेल्या सहकार्याबद्दल खूप खूप आभार. आजवर मला बाळुमामा म्हणून खूप प्रेम दिलंत, खूप साथ दिलीत, मला त्या रोल मध्ये स्वीकारलं, माझ्यावर विश्वास ठेवलात अशीच साथ तुम्ही यापुढेही द्या, असाच विश्वास माझ्यावर ठेवा, आणि असंच प्रेम माझ्यावर अन् माझ्या कामावर करा.

लवकरच भेटूयात

जाता जाता एवढंच म्हणेन
बोला बोला
बाळूमामामाच्या नावानं चांगभलं!

हेही वाचा : अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये अमृता फडणवीस आणि रिहानाची ग्रेट भेट; फोटो शेअर करत म्हणाल्या…

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, सुमीत पुसावळे लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करून प्रोमो शेअर करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sumeet pusavale exit from balumamachya navan changbhala serial shares emotional post sva 00