अभिनेता सुमीत पुसावळे ‘बाळूमामाच्या नावाने चांगभलं’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झाला. काही महिन्यांपूर्वी त्याने या मालिकेतून प्रेक्षकांचा निरोप घेतला. सध्या सुमीत ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. अभिनेता साकारत असलेल्या हृषिकेश रणदिवे या पात्राला अल्पावधीतच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय हृषिकेश-जानकीची जोडी सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

सुमीतच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर १४ डिसेंबर २०२२ मध्ये त्याने लग्न केलं. सुमीतच्या पत्नीचं नाव मोनिका महाजन असं आहे. बायकोबरोबरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. सुमीतची पत्नी दिसायला खूपच सुंदर आहे. आज मोनिकाच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने खास पोस्ट शेअर करत आपल्या बायकोला शुभेच्छा दिल्या आहेत.

Maharashtrachi Hasyajatra Fame Prasad Khandekar share special post for wife
“चाळीतून वन रुम किचनमध्ये…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रसाद खांडेकरने बायकोसाठी केली खास पोस्ट; म्हणाला, “तुझ्या साथीने…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”
a husband expressing love for his wife in front of family
असा नवरा भेटायला नशीब लागतं! कुटुंबासमोर व्यक्त केलं बायकोवरचं प्रेम, पाहा Viral Video

हेही वाचा : अक्षय कुमारच्या सिनेमांवर लावलेले पैसे बुडाले, रकुल प्रीतच्या सासऱ्यांनी २५० कोटींचे कर्ज फेडायला विकलं मुंबईतील ऑफिस

सुमीतने बायकोबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता लिहितो, “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको! आजचा दिवस तुझ्या आयुष्यात परत परत येवो, तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवो. तुझ्या चेहऱ्यावर नेहमी smile राहूदे. तसं बघायला गेलं, तर तुझ्याबरोबर प्रत्येक दिवस एखाद्या उत्सवाप्रमाणे असतो पण, आजचा दिवस खास आहे. कारण, याच दिवसामुळे मला माझं प्रेम मिळालंय. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा बायको! love you so much…Happy birthday”

हेही वाचा : Video : सोनाक्षी सिन्हाला नववधूच्या रुपात पाहताच काजोलची होती ‘अशी’ प्रतिक्रिया, रिसेप्शन पार्टीत दोघीही झाल्या भावुक

सुमीत पुसावळेने शेअर केलेल्या पोस्टवर रेश्मा शिंदेने “वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मोना डार्लिंग” अशी कमेंट केली आहे. अक्षया नाईक, भक्ती देसाई यांनी देखील कमेंट करत मोनिकाला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : आईची साडी, गळ्यात फक्त १ हार अन् केसात…; सोनाक्षी सिन्हाने नोंदणी पद्धतीने विवाह करताना केला ‘असा’ लूक

दरम्यान, ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका सध्या प्रसिद्धीच्या शिखरावर आहे. सध्या या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका टॉप ५ मध्ये आहे. यामध्ये रेश्मा शिंदे आणि सुमीत पुसावळे यांच्यासह प्रतीक्षा मुणगेकर, बालकलाकार आरोही सांबरे, सविता प्रभुणे, भक्ती देसाई, उदय नेने, अक्षय वाघमारे, नयना आपटे, प्रमोद पवार, सुनील गोडसे, ऋतुजा कुलकर्णी, भाग्यश्री दळवी यांनी या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Story img Loader