‘द कपिल शर्मा’ शोच्या माध्यमातून अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती घराघरांत लोकप्रिय झाली. सुमोना या शोमध्ये कपिल शर्माच्या ऑनस्क्रीन पत्नीचे पात्र साकारते. शोमध्ये एकदा कपिलने अभिनेत्रीच्या चेहऱ्याची आणि ओठांची खिल्ली उडवली होती. यामुळे शोमध्ये काम करताना सुरुवातीच्या काही दिवसात प्रचंड त्रास झाल्याचे सुमोनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले.

हेही वाचा : “पैसे कमावण्याची संधी सोडून संघर्ष निवडला”, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला अभिनय क्षेत्रातील प्रवास; म्हणाली, “न्यूयॉर्क विद्यापीठात…”

Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”

सुमोना चक्रवर्ती ‘द हॅबिट कोच’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “‘द कपिल शर्मा’ मध्ये काम करताना सुरुवातीला मला प्रचंड त्रास झाला. कारण, पहिल्याच एपिसोडमध्ये माझ्या चेहऱ्याची चेष्टा करण्यात आली होती. त्यावेळी फारसे कोणी हसले नाही पण, त्यानंतरच्या भागात प्रेक्षक प्रतिसाद देऊ लागले. तेव्हा मी प्रचंड नाराज झाले.”

हेही वाचा : “ताई, साडीतच राहा…”, प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीचा बोल्ड अंदाज पाहून चाहते नाराज

सुमोना पुढे म्हणाली, “मला वाईट वाटल्याने मी अर्चनाला या सगळ्या गोष्टी सांगितल्या. माझ्या चेहऱ्याची, ओठांची चेष्ठा केल्यामुळे मी अनेकदा एपिसोड सुरु असताना माझे स्क्रिप्ट विसरायचे. मी स्टॅंडअप कॉमेडियन नसल्याने अशाप्रकारे खिल्ली उडवणे मला सहन झाले नाही. त्यानंतर अर्चनाने मला खूप समजावले त्या म्हणाल्या, ‘तुझ्यासारखे ओठ हवेत म्हणून अनेक महिला प्रचंड पैसे खर्च करतात’ त्यांच्यामुळे मला धीर आला.”

हेही वाचा : ओटीटीवरील आक्षेपार्ह आणि अश्लील कंटेटवर निर्बंध येणार? मंत्री अनुराग ठाकूर यांनी घेतली महत्त्वाची बैठक

“शोमध्ये झालेल्या चेष्ठेनंतर मी रेड लिपस्टिक लावायला घाबरायचे. महिलांवर कमेंट्स केल्या जातात, खिल्ली उडवली जाते अशा शोमध्ये तू काम करतेस असे प्रश्न अनेकांनी विचारले. पण, हळूहळू परिस्थिती बदलली. बॅकस्टेजला कपिल आणि माझे नाते वेगळे आहे याची जाणीव झाली. स्क्रिप्टचा भाग म्हणून या गोष्टी कराव्या लागतात. पुढे अर्चनाने समजूत काढल्यावर मी पुन्हा रेड लिपस्टिक लावायला सुरुवात केली”, असे सुमोनाने सांगितले.

Story img Loader