Marathi Serial: दैनंदिन मालिका आणि प्रेक्षकांमध्ये एक अतुट नातं असतं. त्यामुळे मालिकांमध्ये थोडा जरी बदल झाला तरी त्यावर मोठा परिणाम होतो. मग हा बदल वेळेचा असो किंवा कलाकारांचा. मालिकेतील बदलामुळे प्रेक्षक अनेकदा नाराज होतात आणि मालिका पुन्हा बघणं टाळतात. असं काहीस गेल्या वर्षी जानेवारीमध्ये एका मालिकेत घडलं होतं. मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेल्या अभिनेत्रीची अचानक एक्झिट झाली. अभिनेत्रीच्या एक्झिटचा परिणाम या लोकप्रिय मालिकेवर होईल अशी शक्यता होती. पण, तसं काही झालं नाही. या लोकप्रिय मालिकेचा प्रेक्षक वर्ष दिवसेंदिवस वाढत गेला. परंतु, आता ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा लवकरच निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे.

येत्या काळात नवनवीन मालिका आणि कार्यक्रम सुरू होणार आहेत. त्यामुळे वाहिन्यांकडून जुन्या मालिका ऑफ एअर केल्या जात आहेत. लवकरच ‘सन मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘प्रेमास रंग यावे’ ( Premas Rang Yave ) ऑफ एअर होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. अक्षरा, सुंदर यांची प्रेमकथा असलेली ही मालिका फेब्रुवारी २०२२पासून सुरू झाली होती. अल्पवधीत या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. या मालिकेत अभिनेता रोहित शिवलकर, अमिता कुलकर्णी, अमृता फडके, समिरा गुजर, गौरी कुलकर्णी, किरण ढगे या कलाकारांनी साकारलेली पात्र घराघरात पोहोचली.

‘प्रेमास रंग यावे’ मालिकेत आधी अक्षराची भूमिका अमिता कुलकर्णीने साकारली होती. अमिताने तिच्या अभिनयाने ही भूमिका एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली होती. त्यामुळे अमिताच्या एक्झिटनंतर अमृता या भूमिकेला कितपत न्याय देते याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. पण अमृता फडकेने अक्षराची भूमिका उत्कृरित्या साकारली. काही दिवसांपूर्वीच मालिकेत अभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडेची एन्ट्री झाली. पण आता लवकरच मालिका बंद होणार आहे.

‘प्रेमास रंग यावे’ मालिकेचं पूजा सावंतशी काय आहे कनेक्शन?

अभिनेत्री पूजा सावंतचे ( Pooja Sawant ) वडील विलास सावंत ‘प्रेमास रंग यावे’ मालिकेचे निर्माते आहेत. बऱ्याचदा ते या मालिकेच्या सेटवर पाहायला मिळाले होते. गेल्या वर्षी ‘प्रेमास रंग यावे’ मालिकेच्या सेटवर पूजा सावंतच्या वडिलांनी कलाकारांबरोबर दहीहंडीचा सण साजरा केला होता.

Story img Loader