काही माहिन्यांपूर्वी ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही लोकप्रिय मालिका ऑफ एअर झाली. आता मालिकेतील कलाकार मंडळी नवनवीन भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सध्या या मालिकेतील लतिका म्हणजेच अभिनेत्री अक्षया नाईक तिच्या बोल्ड फोटोमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. तिचा बोल्ड लूक अनेकांना खटकला आहे. त्यामुळे अक्षयाला ट्रोल केलं जातं आहे. पण या ट्रोलर्सना अक्षया सडेतोड उत्तर देताना दिसत आहे.
अभिनेत्री अक्षया नाईकने नुकताच एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. अक्षयाच्या या फोटोनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे, “बऱ्याच दिवसांनंतर हा फोटो फोनच्या गॅलरीमधून आता इन्स्टाग्रामवर शेअर करत आहे. २०२२मध्ये हे फोटोशूट केलं होतं. हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना मी बराच विचार केला. माझे चाहते मला बोल्ड लूकमध्ये स्वीकारतील की नाही, याची खात्री नाही….पण कधीही न करण्यापेक्षा उशीरा चांगलं. मी एक कलाकार आहे, याची मला जाणीव झाली. जर मी माझ्या कन्फर्ट झोनमधून बाहेर पडलेच नाही तर मी कधीच पुढे जाऊ शकणार आहे…हे करण्यासाठी माझ्याबरोबर माझी काम करणारी चांगली टीम होती. या लूकचा बीटीएस फक्त सबस्क्रायबर्ससाठी असेल.”
हेही वाचा – Video: लग्नानंतर प्रसाद जवादे नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस, ‘या’ लोकप्रिय मालिकेत झाली जबरदस्त एन्ट्री
अक्षयाच्या या बोल्ड फोटोवर तिच्या समर्थनार्थ आणि तिला ट्रोल करणाऱ्या अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अभिनेत्रीने समर्थन करणाऱ्यांचे आभार मानले आहे तर ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “मराठी प्रेक्षक स्वीकार करतील का नाही? हे सांगणं अवघड आहे. परंतु व्यवसायात हे सर्व चालतं. आता तुझ्यावर अवलंबून आहे की प्रेक्षक जर समजा नाराज झाले तर काय करायचं…” या प्रतिक्रियेवर अक्षयाने चोख उत्तर दिलं. ती म्हणाली, “प्रत्येकाला खूश ठेवणं माझ्या हातात नाही. पण स्वतःला खूश ठेवणं नक्कीच आहे. त्यामुळे स्वतःला जे आवडेल तेच करेन. कारण नंतर “मी हे का केलं नाही?” याचा विचार करत वेळ नक्कीच घालवायचा नाही.” तसेच दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “तुला अशी पाहण्याची इच्छा नाही.” अभिनेत्रीने या नेटकऱ्याला “ओके” असं प्रत्युत्तर दिलं. अशा अनेक ट्रोलर्सना अक्षयाने सडेतोड उत्तर दिल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, अक्षयाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिच सध्या रंगभूमीवर ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ हे नाटक जोरदार सुरू आहे. या नाटकात तिच्याबरोबर ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेतील अभिनेता अक्षय मुडावदकर काम करत आहे.