‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमुळे अभिनेत्री अक्षया नाईक घराघरांत लोकप्रिय झाली. नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. २०२० मध्ये ही मालिका कलर्स मराठी वाहिनीवर सुरु झाली होती आणि १४ ऑगस्ट २०२३ रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. या मालिकेमुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. अक्षया नाईकने मालिकेत ‘लतिका’ ही भूमिका साकारली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “मुंबई महानगरपालिका…”, मराठी अभिनेता वाहतूक कोंडीमुळे त्रस्त, फोटो शेअर करत म्हणाला, “वेळ अन् स्थळ…”

अक्षया नाईकने ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर आता अक्षया रंगभूमीवर एन्ट्री करण्यास सज्ज झाली असून ती लवकरच एका नाटकात मुख्य भूमिका साकरणार आहे. रंगभूमीवर येत असलेल्या या नव्या नाटकाची निर्मिती भूमिका थिएटर्स आणि वाईड अँगल एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली आहे. नुकताच या नाटकातील अक्षयाचा खास लुक सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये अभिनेत्रीने कानटोपी, मोठा चष्मा घातलेला दिसत आहे. त्यामुळे अभिनेत्री वृद्ध स्त्रीची भूमिका साकारणार असल्याचे लक्षात येते.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ मालिकेत होणार प्रतिमाची एन्ट्री, अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडीओ चर्चेत, नेटकरी म्हणाले, “बापरे! तुला खरंच…”

“ओळखीचा चेहरा नव्या भूमिकेत आणि नव्या मंचावर येणार तुम्हाला भेटायला! लवकरच” असं अक्षया नाईकने नाटकाची पहिली झलक शेअर करताना म्हटलं आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेलं जुनं नाटक पुन्हा एकदा नव्या रुपात रंगभूमीवर येण्यास सज्ज झालं आहे. या नाटकाचं खूप कौतुकही झालं होतं. प्रभावळकर यांच्या समर्थ लेखणीतून साकारलेल्या या नाटकाला साधारणतः आता पंचवीस वर्षे होऊन गेली आहेत. या नाटकाच्या संगीताची जबाबदारी सुप्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी सांभाळली होती.

हेही वाचा : “मोदकाच्या पाकळ्या करताना…”, विशाखा सुभेदार यांनी दिली मोदक उत्तम होण्यासाठी खास टीप, म्हणाल्या, “त्याचं सारण…”

दरम्यान, अक्षयाबरोबर नाटकात आणखी कोण कलाकार आहेत हे मात्र अजून गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. लवकरच नाटकाबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्यात येईल. असं अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sundara manamadhe bharli fame akshaya naik will be seen in a new role soon sva 00