काही महिन्यांपूर्वी ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मालिकेचं कथानक पूर्ण झाल्यामुळे मालिका ऑफ एअर करण्यात आली. पण मालिका बंद झाली असली तरी मालिकेतील कलाकार अजूनही चर्चेत आहेत. आज ‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील अभिमन्यू म्हणजे अभिनेता समीर परांजपे यांचा वाढदिवस आहे. याच निमित्ताने लतिका म्हणजे अभिनेत्री अक्षया नाईकने समीरसाठी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

अभिनेता समीर परांजपे आणि अक्षया नाईक यांची मध्यवर्ती भूमिका असलेली मालिका ‘सुंदरा मनामध्ये भरली’ २०२०ला सुरू झाली होती. या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं होतं. मालिकेतील अभिमन्यू, लतिका, दौलत ही पात्र घराघरात पोहोचली होती. पण काही काळानंतर अभिमन्यूचा मृत्यू दाखवण्यात आला. त्यामुळे प्रेक्षकवर्गामध्ये नाराजीचं वातावरण पसरलं. परंतु त्यानंतर अभी आणि लतिकाच्या चिमुकल्या मुलीची एन्ट्री दाखवण्यात आली आणि पुन्हा ‘सुंदरा मनामध्ये भरली’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. पण कथानक पूर्ण झाल्यामुळे यावर्षी ऑगस्ट महिन्यात या लोकप्रिय मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. यानंतर मालिकेतील अभिमन्यू म्हणजे समीर परांजपे ‘सूर नवा ध्यास नवा’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला. सध्या तो आपल्या आवाजाने श्रोत्यांची मनं जिंकत आहे. आज त्याच्या वाढदिवस असून सोशल मीडियाद्वारे कलाकार मंडळींसह चाहते त्याला शुभेच्छा देत आहेत.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
a student expressed about life after his father death
“अपघातात वडील वारले अन्…” चिमुकल्याने सांगितली व्यथा; विद्यार्थ्यांसह शिक्षकही रडले, पाहा VIRAL VIDEO
Gashmeer Mahajani
“दिवसभर मद्यप्राशन करायचो, स्वत:ला सहा महिने कोंडून घेतलं…”, नैराश्यात गेलेला गश्मीर महाजनी, सांगितला ‘तो’ कठीण काळ

हेही वाचा – “अंतिम सामना वानखेडेलाच पाहिजे”, भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवानंतर ‘या’ मराठी कलाकारांचं मत

अभिनेत्री अक्षया नाईकने समीरला खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्याबरोबरचा फोटो शेअर करून अभिनेत्रीने लिहीलं आहे, “या भोळ्या चेहऱ्यामागचा सैतान फक्त मला माहित आहे, याचा अभिमान बाळगू की माझं दुर्दैव समजू हे मला कधीच कळलं नाही. मित्र म्हणून तू मला जितका त्रास देतोस, त्याची भरपाई तू तुझ्या उत्तम अभिनयातून आणि आता गायकीतून करतोयस. मित्र म्हणून तुला बघता क्षणी जितक्या शिव्या येतात तोंडात, तितकाच अभिमान वाटतो मला तुझी कला सादर करताना पाहून. हिरो आहेस रे तू आपला…माझे सगळे लाड पुरवण्यासाठी धन्यवाद म्हणणार नाही…तुझी अतिरिक्त जबाबदारी आणि गरज आहे असं समज…करण जोहर तुझ्या बातमीची वाट पाहत आहे… वाढदिवसाच्या शुभेच्छा चुडू…”

हेही वाचा – लग्नानंतर अमृता देशमुखने नवरा प्रसादकडे ‘ही’ इच्छा केली व्यक्त, म्हणाली, “फक्त तू…”

अक्षयाच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहते समीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. शिवाय या पोस्टवर स्वतः समीरने देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहीलं आहे की, तू भेटच आता. फारच गोड लिहीलं आहेस. आता भेटून एक कारल्याचा डोस देतोच. खूप प्रेम.

हेही वाचा – Video: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यावेळी शाहरुख खानच्या कृतीने वेधलं लक्ष, आशा भोसलेंच्या हातात कप पाहिला अन्…

दरम्यान, अक्षयाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिच सध्या रंगभूमीवर ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ हे नाटक जोरदार सुरू आहे. या नाटकात तिच्याबरोबर ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेतील अभिनेता अक्षय मुडावदकर काम करत आहे.

Story img Loader