छोट्या पडद्यावरील मालिकांमुळे अनेक नवोदित कलाकार घराघरांत लोकप्रिय होतात. काही गाजलेल्या मालिकांमधील कलाकार प्रेक्षकांच्या कायमस्वरुपी लक्षात राहतात. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेने जवळपास ३ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेतील प्रत्येक पात्र अल्पावधीतचं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. यामधील लतिका व अभिमन्यूची जोडी छोट्या पडद्यावर विशेष लोकप्रिय ठरली होती. मालिकेत अभिचं पात्र साकारणारा अभिनेता समीर परांजपेने शेअर केलेला असाच एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समीर परांजपेने नुकतीच त्याच्या लेकीच्या शाळेतील स्नेह संमेलनाला उपस्थिती लावली होती. यावेळी अभिनेत्याने त्याच्या लाडक्या मुलीसह एक सुंदर डान्स केला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याशिवाय इतर पालकांसह लेकीच्या आनंदासाठी शालेय कार्यक्रमात डान्स केल्याने अभिनेत्याच्या साधेपणाचं नेटकरी कौतुक करत आहेत.

हेही वाचा : Video : “ती सून नव्हे तर…”, स्वानंदी टिकेकरबद्दल काय म्हणाले सासू-सासरे? अभिनेत्रीने शेअर केला लग्नातील Unseen व्हिडीओ

समीरने लेकीसह केलेला सुंदर डान्स पाहून त्याची पत्नी देखील भारावली होती. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्याची पत्नी अनुजा लिहिते, “पप्पू कॅन डान्स साला…समीरने हा डान्स करून आम्हाला सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं. आता आमच्याकडे असं कोणीतरी आहे जी त्याला कायम डान्स करायला लावू शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समीर तू खरंच खूप छान डान्स करतोस.”

हेही वाचा : ९ वर्षांच्या चाहत्याने कॅन्सरवर मात केल्यानंतर सलमान खानने दिलेलं वचन केलं पूर्ण; मुलाची आई म्हणाली, “त्याच्या मेंदूमध्ये गाठ…”

दरम्यान, समीर परांजपेच्या लेकीबरोबरच्या या गोड व्हिडीओवर नेटकऱ्यांसह अक्षया नाईक, पूजा बिरारी, निरंजन कुलकर्णी या मराठी कलाकारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sundara manamadhe bharli fame sameer paranjape dance with his little daughter in school annual function sva 00