बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्यांमध्ये सुनील शेट्टीचं नाव आवर्जून घेतलं जातं. सुनील शेट्टी त्याच्या कामामुळे तसेच चित्रपटांमुळे कायमच चर्चेत राहिला. काही दिवसांपूर्वीच त्याची लेक अथिया शेट्टीचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. अथिया व क्रिकेटपटू के एल राहुल यांच्या लग्नाची सगळीकडेच जोरदार चर्चा रंगली. आता सुनील शेट्टीच्या होणाऱ्या सूनेची चर्चा सुरू आहे.
आणखी वाचा – “तू हिंदू आहेस म्हणून…” आदिल खानच्या कुटुंबियांबाबत राखी सावंतचा नवा खुलासा, म्हणाली, “इस्लाम धर्म…”
सुनील शेट्टी यांचा लेक अहान शेट्टी गेले काही वर्ष तानिया श्रॉफला डेट करत आहे. या दोघांचे बरेच एकत्रित फोटोही आजवर सोशल मीडियावर व्हायरल झाले. शिवाय तानियानेही तिच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे अहानबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. पण अहान डेट करत असलेली तानिया नेमकी कोण? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
कोण आहे सुनील शेट्टीची होणारी सून?
तानिया ही कोट्यवधी रुपयांची संपत्ती असलेले व्यावसायिक जयदेश श्रॉफ यांची मुलगी आहे. शिवाय तानिया सोशल मीडियावरही बरीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे हजारोंच्या घरामध्ये फॉलोवर्स आहेत. शिवाय तिचे हॉट फोटोही बऱ्याचदा व्हायरल होताना दिसतात. बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकणारं तिचं सौंदर्य आहे.
सुहाना खान, सेलिब्रिटी किड्सचा मित्र ओरहान अवत्रमणि तानियाला सोशल मीडियावर फॉलो करतात. शिवाय तिचे बिकिनीमधील अनेक फोटोही इन्स्टाग्रामवर चर्चेचा विषय ठरले आहेत. गेल्या बऱ्याच दिवसांपासून या अहान व तानियाच्या अफेअरच्या चर्चा रंगत आहेत. पण अजून दोघांनीही त्यांच्या रिलेशनशिपबाबत उघडपणे भाष्य करणं टाळलं आहे.