अभिनेत्री सनी लिओनी ही तिच्या कामाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत असते. तिच्या ग्लॅमरस फोटोंनी ती सगळ्यांचंच लक्ष कायम वेधून घेत असते. इतकच नाही तर ती तिच्या कुटुंबामुळेही चर्चेत असते. तिचा नवरा तिची तिन्ही मुलं यांबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक असतात. आता सनीने पहिल्यांदाच मातृत्वावर भाष्य केलं आहे.
सनी सध्या ‘स्प्लिट्सविला ८’ हा कार्यक्रम होस्ट करताना दिसतेय. या कार्यक्रमाच्या शूटमुळे तिला अनेक तिच्या घरापासून दूर राहावं लागत आहे. काम आणि घर अशी त्याची तारेवरची कसरत सुरू आहे. परंतु तसं जरी असलं तरी तिच्या मुलांची आणि कुटुंबाची व्यवस्थित काळजी घेते. नुकतीच तिने ‘नवभारत टाइम्स’ला एक मुलाखत दिली. यामध्ये आई झाल्यानंतरचा तिने तिचा अनुभव शेअर केला.
आणखी वाचा : Bigg boss 16: “महिलांना कमजोर म्हणण्याआधी …”; शालीन भानोतच्या व्यक्तव्यावर गौहर खानला संताप अनावर
सनी म्हणाली, “आई होण्याचा आनंद हा वेगळ्या स्तरावरचा आनंद असतो. परंतु त्याबरोबर तुमच्यावर अनेक जबाबदारी येतात. तुमच्या मुलांची जबाबदारी घेणं, त्यांची काळजी घेणं, त्यांना शिस्त लावणं या सगळ्या गोष्टी आव्हानात्मक असतात. माझे तिन्ही मुलं खूप गुणी आहेत. मी त्यांना जे सांगेन ते सगळं ती ऐकतात.”
पुढे ती म्हणाली, “अनेक वेळा ते मला थोडं घाबरतातही. कारण पालक म्हणून तुमचा तुमच्या मुलांवर थोडा धाक असणं महत्त्वाचं असतं. परंतु आई होण्याचं सुख हे खूप सुंदर आहे. या नात्यात एक वेगळी ऊर्जा आहे. मुलांचा सांभाळ करणं, त्यांना मोठं होताना बघणं हा एक खूप भावनिक प्रवास आहे.”
दरम्यान सनी लिओनीचं आणि तिच्या मुलांचं नातं अनेकदा प्रेक्षकांसमोर आलं आहे. बऱ्याचदा ती तिच्या मुलांबरोबर वेळ घालवताना दिसते. यावरून त्याचा मुलांबद्दल नातं किती घट्ट आहे आणि जिवाभावाचं आहे हे समोर येतं.