गेल्या वर्षी अनेक मराठी कलाकार विवाहबंधनात अडकले. यापैकी एक जोडपं म्हणजे सुपर्णा श्याम आणि संकेत पाठक. त्यांचा विवाहसोहळा खूप चर्चेत आला होता. तर कालच सुपर्णाने तिची पहिली मंगळागौर साजरी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा : ढोल वाजवणारे स्त्री-पुरुष, झिम्मा-फुगडीचा देखावा अन्…; अक्षया देवधरच्या मंगळागौरीतील रुखवत पाहिलंत का?

सुपर्णाची मंगळागौर खूप थाटामाटात साजरी झाली. या मंगळागौरीसाठी एक हॉलही बुक करण्यात आला होता. दुपारी सुपर्णा आणि संकेतने मंगळागौरीची पूजा केली तर संध्याकाळी खेळ खेळले. याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या मंगळागौरीमध्ये सुपर्णाने घेतलेल्या उखाण्याने विशेष लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा : राणादा-पाठकबाईंनंतर मालिका विश्वातील अभिनेत्याची लगीनघाई, गुपचूप उरकला साखरपुडा

मंगळागौरीला सुपर्णाने नऊवारी साडी नेसली होती. तर त्यावर पारंपारिक दागिनेही घातले होते. संकेतने देखील झब्बा कुर्ता परिधान केला होता. यावेळी सुपर्णाने संकेतच्या नावाचा एक खास उखाणा घेतला. ती म्हणाली, “मंगळसूत्रात ओवले काळे मणी, त्यात ओवले सोन्याचे मणी, त्यात ओवलं डोरलं. संकेत रावांच्या मनावर मी माझं नाव कायमचं कोरलं.” तर सुपर्णाचा हा उखाणा ऐकून संकेतही फिदा झाला. आता त्यांच्यातील या बॉण्डचं त्यांचे चाहते खूप कौतुक करत आहेत.