Munjaya TV Release: ‘मुंज्या’ या भयपटाची खूपच चर्चा झाली. हा चित्रपट ७ जून रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे समीक्षक व प्रेक्षकांकडून खूप कौतुक झाले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. कोकणातील लोककथेवर आधारित ‘मुंज्या’ यावर्षी सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोकणातील लोककथेवर आधारित ‘मुंज्या’ने (Munjya Movie) बॉक्स ऑफिस गाजवलं. या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळ्या दिग्दर्शकाने केलं होतं, तसेच यात बऱ्याच मराठी कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत. या चित्रपटाला सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यानंतर प्रेक्षक हा चित्रपट ओटीटीवर येण्याची वाट पाहत होते. पण प्रेक्षकांना तो ओटीटीआधी टीव्हीवर पाहता येणार आहे.

मराठमोळ्या नम्रता शिरोडकरने मुलांसह केलं देवदर्शन, शेअर केले खास Photos

ज्यांना हा चित्रपट चित्रपटगृहात पाहता आला नाही असे अनेक लोक या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची वाट पाहत होते जेणेकरून त्यांना हा चित्रपट घरी बसून पाहता येईल. चित्रपटाची ओटीटी रिलीज डेट अद्याप आली नसली तरी, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण चित्रपट ओटीटीपूर्वी टीव्हीवर प्रदर्शित होत आहे.

टीव्हीवर पाहता येणार मुंज्या (फोटो – इन्स्टाग्राम)

अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी केलं होतं अरेंज मॅरेज, कोण आहेत त्यांचे पती? जाणून घ्या

टीव्हीवर कधी पाहता येणार ‘मुंज्या’?

हा चित्रपट शनिवारी २४ ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ८ वाजता टीव्हीवर प्रसारित होईल. तुम्हाला हा चित्रपट स्टार गोल्ड चॅनलवर पाहता येईल. पुढच्या वीकेंडला तुम्ही संपूर्ण कुटुंबासह हा चित्रपट पाहू शकता. हा चित्रपट कोकणातील लोककथेवर आधारित आहे.

३० कोटींचे बजेट अन् कमावले १२३ कोटी

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ हा ‘स्त्री’, ‘रूही’ आणि ‘भेडिया’ नंतर मॅडॉक सुपरनॅचरल युनिव्हर्सचा चौथा चित्रपट आहे. हा चित्रपट लिजेंड ऑफ मुंज्याभोवती फिरतो. ‘मुंज्या’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी निर्मात्यांनी ३० कोटी रुपये खर्च केले होते. या चित्रपटाने भारतात ११८ कोटींची कमाई केली, तर जगभरात १२३.१ कोटी रुपयांची कमाई केली. या हिंदी चित्रपटात मोना सिंग, शर्वरी वाघ आणि अभय वर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. तसेच यात सुहास जोशी, अजय पूरकर, भाग्यश्री लिमये, श्रुती मराठे हे कलाकारही आहेत.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री होणार आई, दीड वर्षांपूर्वी केलं आंतरधर्मीय लग्न

शाहरुख खानच्या ‘किंग’मध्ये झळकणार अभय वर्मा?

‘पिंकव्हिला’च्या रिपोर्टनुसार, ‘मुंज्या’ फेम अभिनेता अभय वर्माला शाहरुख खानच्या ‘किंग’ चित्रपटातील एका भूमिकेची ऑफर देण्यात आली आहे. या चित्रपटात शाहरुख खानची मुलगी सुहाना खानदेखील आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजॉय घोष करत असून या चित्रपटाची निर्मिती शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट करणार आहे. अभय वर्माच्या भूमिकेबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही.