‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर लवकरच दोन नव्या मालिका सुरू होणार आहेत. ‘घरोघरी मातीच्या चुली’ व ‘साधी माणसं’ या दोन नव्या १८ मार्चपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ‘घरोघरी मातीच्या चुली’ संध्याकाळी ७.३० वाजता तर ‘साधी माणसं’ संध्याकाळी ७ वाजता पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे प्रेक्षक या दोन नव्या मालिकांची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशात ‘साधी माणसं’ या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे; ज्यामधून मालिकेतील दोन नव्या कलाकारांची झलक झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री शिवानी बावकर व अभिनेता आकाश नलावडे यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘साधी माणसं’ या मालिकेचा नुकताच नवा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या मालिकेत शिवानी मीरा, तर आकाश सत्याच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. नव्या प्रोमोमध्ये मीरा-सत्याचं लग्न होऊन गृहप्रवेश दाखवण्यात आला आहे. यामध्ये मीराचे सासरे व सत्याच्या वडिलांच्या भूमिकेत अभिनेते प्रशांत चौडप्पा पाहायला मिळत आहेत. यापूर्वी त्यांनी ‘स्टार प्रवाह’च्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ या लोकप्रिय मालिकेत काम केलं होतं.

हेही वाचा – “मी देशपांडे, जोशी, कुलकर्णी असते तर खूपच कौतुक झालं असतं”, ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाईक यांचं वक्तव्य

दरम्यान, प्रोमोमध्ये पुढे सासूबाईची दमदार एन्ट्री दाखवण्यात आली आहे. सासूबाईच्या रुपात अभिनेत्री सुप्रिया पाठारे झळकल्या आहेत. त्यांची प्रोमोमधील एकंदरीत भूमिकात पाहता, त्या ‘साधी माणसं’ मालिकेतील खलनायिका असल्याचा अंदाज नेटकरी लावू लागले आहेत. ‘साधी माणसं’ मालिकेचा हा नवा जबरदस्त प्रोमो चांगला चर्चेत आला आहे.

हेही वाचा – उषा नाईकांनी सांगितलं पुरस्कारांचं राजकारण, म्हणाल्या, “दादा कोंडके व उषा चव्हाण यांच्यात…”

मालिकेची कथा?

‘साधी माणसं’ या मालिकेत शिवानी म्हणजे मीरा ही फुलविक्रेती दाखवण्यात आली आहे. तर आकाश म्हणजे सत्या कामधंदे नसणारा दारुच्या आहारी गेलेला तरुण दाखवण्यात आला आहे. एकाच शहरात राहत असले तरी दोघांचा भिन्न स्वभाव आहे. आता या दोघांची भेट कशी होणार? नियती यांच्याबरोबर काय करणार? हे या नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya pathare and prashant choudappa play role in shivani baokar and akash nalawade serial sadhi mansa new promo out pps