लोकप्रिय मालिकांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारून अभिनेत्री सुप्रिया पाठारे नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करतात. सध्या त्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेमुळे चांगल्याच चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी सुप्रिया पाठारे यांच्या लेकाने आईपेक्षा वेगळं क्षेत्र निवडत फूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर गेल्या महिन्यात मिहिर पाठारेने ठाण्यात ‘मharaj’ पावभाजी हे नवं हॉटेल सुरु केलं. या नव्या हॉटेलची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. मराठी मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी या हॉटेलला भेट दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : 69th National Film Awards 2023: ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; ‘या’ चित्रपटांनी मारली बाजी, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

मिहिर पाठारेच्या ‘मharaj’ पावभाजी या हॉटेलला अनेक मालिकांच्या टीमने एकत्रित भेट दिली आहे. अलीकडेच ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेच्या संपूर्ण टीमने ‘मharaj’ पावभाजीचा आस्वाद घेतला. याचा फोटो अभिनेता अभिजीत खांडकेकर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेच्या कलाकारांनी प्रत्यक्ष हॉटेलला भेट न देता सेटवरच पावभाजीचा आस्वाद घेतला. याचा फोटो अभिजीतने शेअर केला आहे. या फोटोत अभिजीतसह उर्मिला कोठारे, हार्दिक जोशी, कांचन गुप्ते, पल्लवी वैद्य, सचिन देशपांडे हे कलाकार दिसत आहेत. अभिजीतने या फोटोवर, “काल ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेच्या सेटवर आम्ही ‘मharaj’ पावभाजीचा आस्वाद घेतला…अप्रतिम चव, सुप्रिया आणि मिहिर पाठारे खूप प्रेम…” असे लिहित खाली दोघांनाही टॅग केले आहे.

हेही वाचा : “सीमा देव यांच्यासारख्या…”; हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत, म्हणाली “सोज्वळ, सुसंस्कृत…”

दरम्यान, साधारण एक महिन्यापूर्वी सुप्रिया पाठारे यांच्या लेकाने ‘मharaj’ पावभाजी आणि फास्ट फूड कॉर्नर हे नवीन हॉटेल सुरु केलं. मिहिर हा प्रोफेशनल शेफ असून यापूर्वी त्याचा ठाण्यात ‘मharaj’पावभाजी फूड ट्रक होता. या फूड ट्रकचं रुपांतर आता हॉटेलमध्ये करण्यात आलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya pathare son made pavbhaji for tuzech mi geet gaat aahe actors sva 00