२६ जुलै १९९४ रोजी ‘तू-तू मैं-मैं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि तुफान लोकप्रिय झाली. या मालिकेत सासू-सुनेमधील कुरबुरी दाखवल्या गेल्या होत्या. आजही प्रेक्षकांच्या मनात या मालिकेचं वेगळं स्थान आहे. तर लवकरच या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच समोर आलं होतं. आता या मालिकेत सुनेच्या भूमिकेत कोण दिसणार यावर अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी भाष्य केलं आहे.

‘तू-तू मैं-मैं’ मालिकेमध्ये सुप्रिया पिळगावकर सुनेच्या भूमिकेत होत्या तर अभिनेत्री रीमा लागू यांनी या मालिकेत सासूची भूमिका साकारली होती. तर आता या मालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये सुप्रिया पिळगावकर सासूच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे या मालिकेत सुनेच्या भूमिकेत कोण दिसणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.

Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Mann Ka Geet, Mann Ki Baat, Narendra Modi,
‘मन की बात’नंतर आता ‘मन का गीत’; गीत, संगीत, नृत्य, अभिवाचन आणि दृकश्राव्य माध्यमातून नरेंद्र मोदी यांच्या कवितांचा कार्यक्रम
Paaru
Video: पारू आदित्यला नवरा मानत असल्याचे सत्य श्रीकांतसमोर येणार? पाहा ‘पारू’ मालिकेचा नवीन प्रोमो
Punha Kartvya Aahe
Video: “तू काय प्रेम करणार?”, आकाशची वसुंधरावर नाराजी; प्रेक्षकांनी केले कौतुक, म्हणाले, “तुमची जोडी…”
sharvari jog and Abhijit amkar new serial Tu Hi Re Maza Mitwa New promo out
Video: ‘स्टार प्रवाह’च्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेचा नवा दमदार प्रोमो प्रदर्शित, नेटकरी म्हणाले, “कडक…”
Priyadarshini Indalkar
“त्या स्कीटनंतर इतकं हसं झालं”, अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने सांगितला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील किस्सा; म्हणाली…
woman dies in stampede during pushpa 2 movie
‘पुष्पा-२’ चित्रपटादरम्यान चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू

आणखी वाचा : ‘तू-तू मैं-मैं’ मालिका पुन्हा नव्याने येणार प्रेक्षकांच्या भेटीला, ‘ही’ अभिनेत्री दिसणार सासूच्या भूमिकेत

याबाबत बोलताना सुप्रिया पिळगावकर म्हणाल्या, “या मालिकेचे दिग्दर्शक निर्माते सुनेच्या भूमिकेसाठी कोणत्या अभिनेत्रीला कास्ट करणार आणि तिची आणि माझी केमिस्ट्री कशी निर्माण होणार हे पाहणं खूप औत्सुक्याचं आहे. कारण रीमाजी आणि माझ्यामध्ये खूप चांगली केमिस्ट्री तयार झाली होती. आत्ताच्या घडीला अनेक उत्तम अभिनेत्री आहेत त्यामुळे या भूमिकेसाठी एका अभिनेत्रीची निवड करणं हे खरोखरच कठीण आहे. आमची मालिका म्हणजे ‘टॉम ॲण्ड जेरी’सारखी आहे. त्यामुळे उत्स्फूर्त अभिनेत्रीला दिग्दर्शक कास्ट करतील.”

हेही वाचा : Video: अखेर प्रतीक्षा संपली! सचिन व सुप्रिया पिळगावकर अनेक वर्षांनी एकत्र थिरकणार, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, ‘तू-तू मैं-मैं’ या मालिकेचं दिग्दर्शन सचिन पिळगावकर यांनी केलं होतं. आता या मालिकेच्या पुढील भागावर ते काम करत आहेत. त्यामुळे ही नवी मालिका प्रेक्षकांच्या कधी भेटीला येणार आणि यात कोण कलाकार दिसणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूप आतुर झाले आहेत.

Story img Loader