स्टार प्लस या वाहिनीवर प्रसारित होणारी ‘अनुपमा’ ही मालिका सध्या खूप चर्चेत आहे. या लोकप्रिय मालिकेमध्ये रुपाली गांगुली यांनी अनुपमा शहा हे प्रमुख पात्र साकारले आहे. मध्यंतरी त्या काही काळ मनोरंजन विश्वापासून लांब राहिल्या होत्या. या मालिकेद्वारे त्यांनी छोट्या पडद्यावर कमबॅक केले. ही मालिका नेहमीच टीआरपीच्या स्पर्धेमध्ये अव्वल स्थानावर असते. लिखाण आणि सादरीकरण या दोन महत्त्वपूर्ण विभागामुळे या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

मालिकेमध्ये सध्या अनुपमा शिक्षण पुर्ण करण्याचा निर्धार करते आणि अनुज तिला मदत करतो असा ट्रॅक सुरु आहे. या संबंधित एक व्हिडीओ स्टार प्लस वाहिनीच्या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघे एकत्र दिवाळी साजरी करत असल्याचे पाहायला मिळते. या निमित्ताने अनुज तिला कॉलेजचा फॉर्म दिवाळीचे गिफ्ट म्हणून देतो आणि अनुपमाचा नवा प्रवास सुरु होतो असे दाखवण्यात आले आहे. दरम्यान मालिकेशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
a woman police made bhakri she keeps duty and responsibility at the same time
एकीकडे कर्तव्य तर दुसरीकडे जबाबदारी! महिला पोलीस बनवतेय भाकरी, Video एकदा पाहाच
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Virat Kohli Depicted as Clown in Australian Newspaper After on-field bust up with Sam Konstas in Melbourne IND vs AUS
IND vs AUS: ‘विराट कोहली जोकर’, ऑस्ट्रेलियन मीडियाने कोन्स्टासबरोबरच्या वादानंतर विराटला केलं लक्ष्य, वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर असा फोटो…
A young man was brutally beaten to death due to an immoral relationship in Nagpur
विवाहित प्रेयसीची अंधारातील भेट प्रियकराच्या जीवावर बेतली

आणखी वाचा – “मी मराठी असल्याने…”; माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीने सांगितल्या दिवाळीच्या गोड आठवणी
अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांची या मालिकेमध्ये एंट्री होणार आहे. जस्टशोबिजने दिलेल्या वृत्तानुसार, अनुपमा ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहे, त्या कॉलेजमधल्या शिक्षिकेचे पात्र त्या आहेत. या पात्राच्या रुपाने अनुपमाला मार्गदर्शक लाभणार आहे. तसेच त्या अनुजच्या आईचे पात्र साकारणार आहेत असेही म्हटले जात होते. पण एका विमान अपघातामध्ये त्याच्या आईवडिलांचे निधन झाल्याचे सुरुवातीच्या काही भागांमध्ये सांगण्यात आले असल्यामुळे मिळालेली माहिती खोटी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भामध्ये आतापर्यंत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

आणखी वाचा – ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून मेघा घाडगे बाहेर, सदस्यांना दिला मोलाचा सल्ला

सचिन पिळगावकर यांच्याप्रमाणे सुप्रिया यांनीही मराठीसह हिंदी माध्यमांमध्ये काम केले आहे. त्या टेलिव्हिजन विश्वामध्ये फार सक्रिय आहेत. त्यांची दूरदर्शनवर प्रदर्शित होणारी ‘तू तू मैं मैं’ ही मालिका खूप गाजली होती. ‘लाखो में एक’, ‘ससूराल गेंदा फूल’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’, ‘इश्कबाज’ अशा लोकप्रिय हिंदी मालिकांमध्ये त्यांनी काम केले.

Story img Loader