छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय ठरलेला अवधूत गुप्तेचा ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वीच या कार्यक्रमाचं तिसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. परंतु या मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्ये फक्त राजकारण्यांनाच बोलवलं जातं असं म्हणत काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांनी या कार्यक्रमावर नाराजी व्यक्त केली. परंतु आता प्रेक्षक या चित्रपटाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.
या कार्यक्रमामध्ये आत्तापर्यंत राज ठाकरे, नारायण राणे, संजय राऊत, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, सुबोध भावे अशा अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. तर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या नव्या भागात या मंचावर हजेरी लावणार आहेत.
आणखी वाचा : ए आर रेहमानच्या कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरी, ढिसाळ नियोजन; चाहत्यांच्या सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया
नेहमीप्रमाणेच या भागातही आपल्याला बरीच धमाल पाहायला मिळणार आहे. अवधूत गुप्ते यांच्या खुपणाऱ्या प्रश्नांना सुप्रिया सुळे बेधडकपणे सामोऱ्या जाणार आहेत. याबरोबरच या भागात सुप्रिया सुळे आपल्याला हळव्या झालेल्याही आपल्याला पाहायला मिळत आहेत. नुकतंच या नव्या भागाचा प्रोमो झीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
या प्रोमोवरुन हे स्पष्ट होत आहे की या कार्यक्रमात अजित पवार यांच्या पक्ष सोडून जाण्यामुळे सुप्रिया सुळे हळव्या झाल्या आहेत. दूर गेलेल्या लोकांच्या आठवणी या कधीच आपली साथ सोडत नाही हे स्पष्ट होत आहे. यादरम्यान सुप्रिया सुळे चांगल्याच भावूक झाल्या होत्या. आता नेमकं कोणत्या धारदार प्रश्नाने सुप्रिया सुळे यांना हळवं केलं ते नवा एपिसोड आल्यावर समजेलच. येत्या रविवारी म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी हा एपिसोड ‘झी मराठी’वर पाहायला मिळणार आहे.