Supriya Sule Post for Suraj Chavan: सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला आहे. गुलीगत धोका म्हणत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सूरज चव्हाणला बिग बॉसमध्ये येण्याची संधी मिळाली आणि त्याने ७० दिवसांच्या प्रवासानंतर ट्रॉफीवर नाव कोरलं. त्याने हा शो जिंकताच त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीकर असलेल्या सूरज चव्हाणसाठी खास पोस्ट केली आहे.
सूरज चव्हाणने सर्व स्पर्धकांना मागे टाकत बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व जिंकले. तर अभिजीत सावंत या पर्वाचा उपविजेता ठरला. घरातील १७ स्पर्धकांशी स्पर्धा करून अन् ७० दिवस या घरात पूर्ण करून सूरजने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि तो सर्वाधिक मतं मिळवून या पर्वाचा विजेता ठरला. त्याला बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Bigg Boss Marathi Winner : ‘गुलीगत धोका’ म्हणत सूरज चव्हाण ठरला पाचव्या पर्वाचा महाविजेता!
सूरज चव्हाणच्या नावाची घोषणा रितेश देशमुखने केली, तो व्हिडीओ शेअर करत सुप्रिया सुळेंनी लिहिलं, “कलर्स मराठी या वाहीनीवर सुरु असलेल्या ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शो मध्ये आपल्या बारामतीचा रीलस्टार सूरज चव्हाण हा विजेता ठरला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन सूरजने हे यश मिळविले. बिग बॉसच्या घरात सूरजने जनतेच्या हृदयात जागा निर्माण केली. त्याचे या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन तथा पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. सूरज आम्हाला तुझा अभिमान वाटतो.”
Bigg Boss Marathi 5 चा उपविजेता ठरलेल्या अभिजीत सावंतची पहिली पोस्ट; म्हणाला, “मला जे वाटतंय ते…”
सुप्रिया सुळे यांच्या या पोस्टवर कमेंट करत नेटकरी सूरजवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, कलर्स वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवणार असल्याची घोषणा या ग्रँड फिनालेमध्ये केली आहे.