खासदार सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सुप्रिया सुळे यांनी राजकारणात स्वतःचं एक स्थान निर्माण केलं आहे. नुकतंच सुप्रिया सुळे यांनी झी मराठीच्या ‘खुपते तिथे’ गुप्ते या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.
या एपिसोडमध्ये सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या राजकारणातील अनुभवाबद्दल भाष्य केलं. याबरोबरच अजित पवार यांच्या पक्ष सोडून जाण्याबद्दलही त्यांनी खुलासा केला. याबद्दल बोलताना सुप्रिया सुळे भावुक झाल्या. शिवाय या कार्यक्रमात त्यांनी एक नेता कसा असावा? याबद्दलही भाष्य केलं आहे.
आणखी वाचा : श्रेया धन्वंतरीचा वेस्टर्न साडीतील हॉट लूक व्हायरल; इंस्टाग्रामवरील फोटो पाहून नेटकरी हैराण
मराठा संघटनेचा आधीच्या मोर्चाबद्दल बरंच कौतुक झालं होतं पण काही दिवसांपूर्वी जालन्यातील मोर्चावर जो लाठीहल्ला झाला त्याबद्दल नेमकं काय वाटतं असं अवधूतने सुप्रिया सुळे यांना विचारलं. यावर त्या म्हणाल्या, “जालन्यात जे झालं ते अतिशय दुर्दैवी आहे. त्यासाठी सरकारच जवाबदार आहे. कारण अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला अन् त्यासाठी त्यांना माफीही मागावी लागली. खरी लीडरशीप काय? चांगला लीडर कोण असतो? यश मिळालं तर त्याचं क्रेडिट टीमला डदेतो अन् अपयश आलं तर त्याची जवाबदारी स्वतःवर घेतो. ही खरी लीडरशीप.”
सुप्रिया सुळे यांनी या कार्यक्रमात अशा बऱ्याच धारदार प्रश्नांची सफाईदार उत्तरं दिली आहेत. दरम्यान, या कार्यक्रमामध्ये आत्तापर्यंत राज ठाकरे, नारायण राणे, संजय राऊत, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, सुबोध भावे अशा विविध श्रेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली आहे.