Suraj Chavan And Ankita Walawalkar : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे सूरज चव्हाण महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय झाला. नुकताच या ‘गुलीगत किंग’ने आपला ३० वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या दिवशी त्याच्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत होता. अभिजीत सावंत, पंढरीनाथ कांबळे, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, वैभव चव्हाण, धनंजय पोवार या त्याच्या सगळ्या सह-स्पर्धकांनी सूरजला फोन करून, तर कोणी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

सूरज चव्हाणला ‘बिग बॉस’च्या घरात सर्वांनीच पहिल्या दिवसापासून सांभाळून घेतलं. शिक्षण कमी असल्याने सुरुवातीला सूरजला टास्क समजून घेण्यात अडचणी निर्माण व्हायच्या. पण, पंढरीनाथ व अंकिताने त्याला या काळात खंबीरपणे साथ दिली. “बाहेर जाऊन तू तुझं शिक्षण पूर्ण कर” असा सल्ला देखील या सगळ्यांनी सूरजला दिला. नुकताच वाढदिवसानिमित्त ‘कोकण हार्टेड गर्ल’ने सूरजला फोन केला होता. यावेळी दोघांनी एकमेकांशी भन्नाट संवाद साधला.

saif ali khan bandra apartment inside details
५ बेडरूम, जिम, स्विमिंग पूल अन्…; सैफ अली खानवर हल्ला झाला ते घर आहे तरी कसं? ‘इतक्या’ कोटींना केलेलं खरेदी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Son Ibrahim Ali Khan Rushed Saif Ali Khan To Hospital
वडिलांसाठी मध्यरात्री धावून आला इब्राहिम अली खान; हल्ल्यानंतर जखमी सैफला रुग्णालयात केलं दाखल, नेमकं काय घडलं?
Saif Ali Khan Attacked News
“मध्यरात्री २.३० वाजता…”, सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यावर जवळच्या व्यक्तीचा खुलासा, सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांची मोठी घोषणा; “निवडणुकीत जात आणि धर्म आणला जातो, त्यामुळे यापुढे….”
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”

हेही वाचा : “केदार सर माझ्यासाठी देव, त्यांनी मुलगा मानलंय…”, सूरज नवा फोन घेतल्यावर ‘या’ नावाने सेव्ह करणार केदार शिंदेंचा नंबर

अंकिताने सुरुवातीला सूरजकडे गोड तक्रार केली. “सकाळपासून फोन करतेय…तुझा फोन दुसरे लोक उचलतात. तुझा नंबर दे… मला भेटायचं होतं आता तुला फोन कशावर करायचा” मानलेल्या बहिणीची ही गोड तक्रार ऐकून सूरज देखील अंकिताला “तू कधीही ये मी आहे ना…” असं म्हणाला. यानंतर सूरजने अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल विचारपूस केली.

अंकिता वालावलकर लवकरच मराठी संगीत दिग्दर्शक कुणाल भगतबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल विचारपूस करताना सूरज म्हणाला, “दाजींना सांग गाणी चांगली बनवा… नाहीतर तुला तिथे येऊन बुक्कीत टेंगूळ हाणेल.” अंकिता पुढे म्हणते, “दाजी तुझा फोन ऐकत आहेत सांगते त्यांना… आणि हो काळजी नको करूस दाजी तुझी गाणी व्यवस्थित करतील” हा संवाद साधताना दोघंही हसत असतात. यावरून शो संपल्यावर देखील अंकिता व सूरजमध्ये किती छान बॉण्डिंग आहे हे पाहायला मिळतं.

हेही वाचा : सूरज चव्हाणचं टोपणनाव माहितीये का? सगळे गावकरी त्याच नावाने मारतात हाक! काय आहे भन्नाट किस्सा? जाणून घ्या…

दरम्यान, आता अंकिता वालावलकर सूरजच्या गावी केव्हा जाणार आणि या दोघांची भेट केव्हा होणार हे पाहण्यासाठी दोघांचेही चाहते आतुर झाले आहेत.

Story img Loader