Suraj Chavan : स्वत:ला ‘गुलीगत किंग’ म्हणणाऱ्या सूरज चव्हाणने यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनच्या विजेतेपदावर आपलं नावं कोरलं आहे. त्याच्या नावाची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. सूरजचा आजवरचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. लहानपणीच आई-वडिलांचं निधन झाल्याने बहिणीने त्याचा सांभाळ केला. त्यानंतर त्याला आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. टिकटॉक सुरू केल्यावर त्याच्याबरोबर आर्थिक फसवणुकीच्या घटना घडल्या पण, या सगळ्यावर मात करत आजच्या घडीला सूरजने एवढं मोठं यश मिळवलं आहे.

सूरज चव्हाणचे ( Suraj Chavan ) रील्स व्हिडीओ घराघरांत प्रसिद्ध आहेत. त्याची लोकप्रियता पाहून ‘बिग बॉस’च्या टीमने त्याला एवढा मोठा शो ऑफर केला. सुरुवातीला सूरजने याला नकार कळवला होता. मात्र, कालांतराने शोसाठी होकार देऊन ग्रँड प्रिमियरला घरात प्रवेश घेणारा सूरज शेवटचा सदस्य ठरला. याच दिवशी, “मी शेवटी घरात आलोय आता मी शेवटी बाहेर जाणार” असं सूरजने म्हटलं होतं. तब्बल ७० दिवसांचा प्रवास पूर्ण करून त्याने ‘बिग बॉस मराठी’च्या झगमगत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय. आता शो संपल्यावर सूरजला आणखी एक लॉटरी लागली आहे.

हेही वाचा : धनंजय पोवारच्या स्वागतासाठी खास कोल्हापुरी हलगी! डीपीच्या भव्य दुकानाबाहेर चाहत्यांची गर्दी, करतो ‘हे’ काम जाणून घ्या…

सूरजचा ( Suraj Chavan ) पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याचा नेहमीपेक्षा काहीसा हटके लूक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. चित्रपटात टक्कल केलेला सूरज त्याच्या गुलीगत स्टाइलने प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. याबद्दल पोस्ट शेअर करत तो लिहितो, “भावांनो नमस्कार, मला सांगायला आनंद होतोय… मी तुमच्या आशीर्वादाने ‘बिग बॉस’ विजेता झालो. आता येत्या १८ ऑक्टोबर २०२४ पासून माझा ‘राजाराणी’ नावाचा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय. जसा तुम्ही मला ‘बिग बॉस’मध्ये असताना सपोर्ट केला तसा माझ्या ‘राजाराणी’ चित्रपटाला सुद्धा सुपरहिट करा ही विनंती”

हेही वाचा : सूरज चव्हाण जिंकल्यावर केलेल्या ‘त्या’ पोस्टमुळे अभिनेता झाला ट्रोल, म्हणाला, “आई बहिणीवरून शिव्या देणाऱ्यांनी आधी…”

( Suraj Chavan )

दरम्यान, ‘राजाराणी’ चित्रपटात सूरजसह ( Suraj Chavan ) भारत गणेशपुरे, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण, शिवाजी दोलताडे, तानाजी गालगुंडे या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘सोनाई फिल्म क्रिएशन’ प्रस्तुत ‘राजाराणी’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केली आहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी दोलताडे यांनी सांभाळली आहे.