Bigg Boss Marathi Suraj Chavan Casting : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनला यंदा प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा या कार्यक्रमाने बाजी मारल्याचं पाहायला मिळालं. गेले चार सीझन या शोमध्ये केवळ मनोरंजन विश्वाशी संबंधित कलाकार घरात सहभागी होत होते. मात्र, यावर्षी पहिल्यांदाच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी घरात एन्ट्री घेतली होती. यामुळे ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वाची लोकप्रियता शिगेला पोहोचली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रेक्षकांना गेल्या काही महिन्यांपासून सर्वात जास्त कुतूहलता सूरज चव्हाणच्या कास्टिंगबाबत निर्माण झाली आहे. याविषयी ‘एन्डमोलशाईन इंडियाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि प्रोजेक्ट हेड’ केतन माणगांवकर यांनी ‘नवशक्ती’शी संवाद साधताना खुलासा केला आहे. ते म्हणाले, “फेब्रुवारीपासून आम्ही या सीझनच्या कास्टिंगला सुरुवात केली होती. आम्ही प्रत्येकाला वैयक्तिकरित्या भेटलो. आता सूरजबद्दल ( Suraj Chavan ) सांगायचं झालं, तर त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा काहीच मार्ग नव्हता. मी त्याचं प्रोफाइल पाहिलं होतं, त्यावर एक नंबर होता तो लागत नव्हता. मग थोडी विचारपूस केल्यावर आम्हाला समजलं की, तो कोणत्या तरी गावात राहतो पण, कुठे राहतो वगैरे काहीच माहिती नव्हतं.”

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “त्यांची फालतुगिरी सुरू होती, दोघांनी अफेअर…”, निक्की-अरबाजच्या नात्यावर पंढरीनाथ कांबळेचं रोखठोक मत; म्हणाला…

सूरजने ‘बिग बॉस मराठी’साठी दिलेला नकार

केतन पुढे म्हणाले, “माझ्या टीमला मी काही करून त्याला संपर्क करा असं सांगितलं होतं. मग, माझी टीम जेजुरीच्या पुढे सूरज ( Suraj Chavan ) एका गावात राहतो तिथे जाऊन पोहोचली. ज्यावेळी त्याची भेट घेतली तेव्हा तो म्हणाला, ‘मला शो माहितीये पण, मला सहभाग घ्यायचा नाहीये. मला गावात राहायचं आहे’ मग, मी व्हिडीओ कॉल करून त्याला मी समजावलं. त्याला फार गर्दी आवडत नाही…त्याला त्याची माणसं आवडतात. तो गाव सोडून फारतर १ ते २ वेळा बाहेर गेला होता. त्याला मी २-३ एपिसोड बघ आणि निर्णय घे असं समजावून सांगितलं.”

“आमचं भेटण्याचं ठरलं आणि त्यानंतर आम्ही एका मोठ्या हॉटेलमध्ये बसलो होतो. तिथे तो आला तेव्हा त्याने तोंडावर रुमाल बांधला होता आणि त्या गार्डने त्याला थांबवलं मग, मी हात दाखवून सांगितलं की, तो मला भेटायला आला आहे. त्यानंतर मग आत येऊन सूरजने तोंडावरचा रुमाल काढला आणि पुढच्या १० सेकंदात त्याच्या अवतीभोवती गर्दी निर्माण झाली होती. त्याच्याबरोबर प्रत्येकाला फोटो काढायचे होते. म्हणजे ज्या माणसाला काही वेळापूर्वी आत सोडत नव्हते, त्याने रुमाल काढल्यावर एवढी गर्दी झाली तेव्हाच मला जाणवलं हा खूप वेगळा आहे पण, तरीही अंतिम निर्णय मी त्याच्यावर सोडला होता.”

हेही वाचा : Bigg Boss मध्ये शिव ठाकरेची एन्ट्री! घरात पाऊल ठेवताच सर्वांना म्हणाला, “तुम्हा सर्वांना महाराष्ट्राकडून…”

सूरज चव्हाण ( Suraj Chavan )

“सूरजला ( Suraj Chavan ) काहीच माहिती नव्हतं…एवढं मोठं घर, बाथरुम वगैरे त्याने पाहिलं नव्हतं या सगळ्याची त्याच्या मनात भीती होती. पण, मी त्याला भेटून सगळं समजावलं. माझ्यामते सगळ्यात जास्त मी सूरजलाच भेटलो. त्याला हळुहळू आत्मविश्वास आला. मग, आम्हाला सुद्धा त्याच्याबद्दल एक आत्मविश्वास निर्माण झाला. मग, सगळ्यांशी चर्चा करून आम्ही सूरजला आधी सगळं बाथरुम वगैरे वापरायला शिकवलं…घरातल्या गोष्टी सांगितल्या…त्यानंतर त्याला बिग बॉसच्या स्पर्धेत पाठवलं.” असं केतन माणगांवकरांनी सांगितलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suraj chavan bigg boss marathi casting incidence reveals by project head ketan mangaonkar sva 00