Bigg Boss Marathi Contestant Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. यंदा घरात एकूण १६ स्पर्धकांनी प्रवेश केला आहे. यामध्ये ‘गुलीगत धोका’ फेम रीलस्टार सूरज चव्हाणचा देखील समावेश आहे. घरात प्रवेश घेतल्यावर सगळे स्पर्धक एकमेकांशी गप्पा मारत होते. योगिता, पंढरीनाथ कांबळे आणि आर्या जाधव यांच्याशी संवाद साधताना सूरजने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे.

सुरुवातीच्या काळात फार मोठा संघर्ष करून व अनेक अडचणींवर मात करत सूरज चव्हाणने आज सोशल मीडियावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. वडिलांचं निधन झाल्यावर या रीलस्टारने आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. याबद्दल घरातील अन्य सदस्यांशी संवाद साधताना सूरजने खुलासा केला आहे.

हेही वाचा : आलिया-रणबीरच्या वयात आहे ११ वर्षांचं अंतर; दोघांची पहिली भेट केव्हा झाली? अभिनेता म्हणाला, “बालिका वधू चित्रपट…”

सूरज चव्हाणने सांगितला आयुष्यातील संघर्ष ( Suraj Chavan )

‘गुलीगत धोका’ फेम सूरज चव्हाण म्हणाला, “माझ्या घरातली परिस्थिती प्रचंड वाईट होती. माझ्या वडिलांना कॅन्सर झाला. वडिलांचं त्यामध्ये निधन झालं आणि या सगळ्या धक्क्यातून माझी आई सावरू शकली नाही. या तणावामुळे तिला वेड लागलं…आईला रक्ताच्या उलट्या होत होत्या. तिला खूप त्रास व्हायचा…ती पूर्ण खचून गेली होती. माझी आई अन् आजी एकाच दिवशी वारल्या.”

सूरज पुढे म्हणाला, “दोघींचा जीव एकाच दिवशी गेल्याने त्या सासू-सुनेने एकमेकींना शेवटचं बघितलं सुद्धा नाही. आता माझ्या घरात फक्त आत्या आणि माझ्या सख्ख्या ५ बहिणी आहेत. मला सुरुवातीला अनेक लोकांनी लुटलंय त्यामुळे माझ्या बहिणी फक्त मला सांगतात… तू सुधार मग आम्हाला खूप बरं वाटेल.”

हेही वाचा : प्रियांका चोप्रा-अक्षय कुमारच्या २१ वर्षे जुन्या रोमँटिक गाण्यावर मानसी नाईकच्या दिलखेचक अदा; चाहते म्हणाले, “खूपच सुंदर…”

सूरजची ( Suraj Chavan ) दिवसाची कमाई किती?

सूरजला पंढरीनाथ कांबळे दिवसाच्या कमाईबद्दल विचारतो…तेव्हा तो म्हणतो, “मला आधी दिवसाला ८० हजार मिळायचे…तेव्हा टिकटॉक होतं. आताही मला ३० ते ५० हजार मिळतात. बच्चा बच्चा जानता है ‘गुलीगत धोका’ कोण आहे.”

Suraj Chavan
सूरज चव्हाण ( Suraj Chavan )

हेही वाचा : ठरलं तर मग : मायलेकींचं प्रेम! प्रतिमासाठी सायली गाणार अंगाई; पूर्णा आजीचे डोळे पाणावले, मालिकेत पुढे काय घडणार?

दरम्यान, सूरज चव्हाण आता ‘बिग बॉस’च्या घरात आता कसा खेळ खेळणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. पहिल्याच दिवशी डिसिजन घेण्यात कमी पडतोय असं कारण देत घरातील अन्य सदस्यांनी त्याला नॉमिनेट केलं होतं. पण, ‘बिग बॉस’च्या नव्या ट्विस्टमुळे तोच डिसिजन मेकर ठरणार आहे.

Story img Loader