Happy Birthday Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) पाचव्या सीझनमुळे सध्या सूरज चव्हाण हे नाव महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलं आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये सूरजला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. याचीच पोचपावती म्हणून या ‘गुलीगत किंग’ने यंदा ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. आज संपूर्ण महाराष्ट्र सूरजला ओळखत असला तरीही, याचं मूळ टोपणनाव वेगळंच आहे. याबद्दल या सोशल मीडिया स्टारने ‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.

सूरजला ( Suraj Chavan ) यावेळी “लहान असताना मारामाऱ्या वगैरे केल्यास का?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तो आधी उत्तर देण्यास टाळाटाळ करत होता मात्र, अखेर जुना किस्सा सांगताना सूरज चव्हाण म्हणाला, “लहानपणी मी खूप मस्ती करायचो. शाळेत पोरांची डोकी फोडायचो. मला राग आला की, माझ्याकडून तसं व्हायचं… मला खूप राग आल्यावर शाळेत पोरांचं दगडाने डोकं फोडलंय. पण, त्यानंतर मी खूप कंट्रोल केलं. हळुहळू मोठा झाल्यावर मी प्रचंड शांत झालो.”

हेही वाचा : Bigg Boss Marathi – Video : “अरे कुठे आहेस…”, सूरजला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अंकिताने केला फोन, भावाकडे केली गोड तक्रार

सूरज चव्हाणचं टोपणनाव काय आहे?

पुढे त्याला, “एवढं डोकं फोडल्यावर संबंधित मुलांचे आई-वडील तुझ्या घरी जाब विचारायला नाही आले का?” असं विचारण्यात आलं. यावर सूरज म्हणाला, “नाही आलं कोणी मला विचारायला… आता यावरून मला एक किस्सा आठवला तो मी तुम्हाला सांगतो, माझं टोपणनाव आहे ‘कच्च्या’. माझ्या चुलत्याने मला ‘कच्च्या’ नाव पाडलेलं…पण, माझ्या बाबांनी माझं नाव सूरज ठेवलं. सूरज चमकला… संपूर्ण महाराष्ट्रात सगळीकडे माझं नाव झालं. टॉपला गाजला हा ‘गुलीगत किंग’. आजही माझ्या गावी सगळे मला ‘कच्च्या’ म्हणतात. सगळेजण गावात मला ‘कच्च्या’ म्हणून आवाज देतात पण, आता महाराष्ट्र सूरज म्हणून ओळखतोय.”

हेही वाचा : Suraj Chavan – “सूरज चव्हाण हे नाव माझ्या आयुष्यात…”, सूरजला मिठी मारताच पंढरीनाथचे डोळे पाणावले, वाढदिवसानिमित्त लिहिली खास पोस्ट

सूरज चव्हाणने केला टोपणनावाबद्दल खुलासा ( Suraj Chavan )

दरम्यान, आता लवकरच हा ‘बिग बॉस’ विजेता केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ सिनेमात झळकणार आहे. या चित्रपटाची सूरजचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.