Suraj Chavan : लहानशा मोढवे गावातून आलेला सूरज चव्हाण आज संपूर्ण महाराष्ट्रभरात लोकप्रिय झाला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात ग्रँड प्रीमियरला १६ व्या क्रमांकावर म्हणजेच सगळ्यात शेवटी त्याने प्रवेश केला होता. यावेळी ‘मीच घरातून शेवटी बाहेर पडेन आणि ट्रॉफी जिंकेन’ असा निर्धार त्याने केला होता. अखेर सूरजने त्याचा शब्द खरा करून दाखवला आणि यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचं विजेतेपद पटकावलं. सूरजला वैयक्तिक आयुष्यात अनेकदा आर्थिक फसवणुकीचा सामना करावा लागला. मात्र, ‘बिग बॉस’ जिंकल्यावर आता सूरजच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांचा आकडा वाढू लागला आहे. यासंदर्भात सूरजने पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे.

सूरज चव्हाणने ( Suraj Chavan ) ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश घेतल्यावर त्याच्या नावाने इन्स्टाग्रामवर अनेकांनी अकाऊंट्स तयार केले. शो सुरू असताना सोशल मीडियावरील अनेक अकाऊंट्सवरून “सूरजला पाठिंबा द्या” अशी विनंती प्रेक्षकांना केली जायची. मात्र, यापैकीच काही बनावट अकाऊंट्सवरून सूरजच्या नावाने त्याच्या चाहत्यांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याची बाब सूरज व त्याच्या टीमला लक्षात आली आहे. यासंदर्भात त्याच्या अधिकृत अकाऊंटवरून पोस्ट शेअर करून माहिती देण्यात आली आहे. तसेच सगळ्या चाहत्यांना यापुढे आर्थिक फसवणुकीच्या बाबतीत काळजी घेण्याचं आवाहन देखील या पोस्टद्वारे करण्यात आलं आहे.

Rajasthan elderly couple suicide
उपाशी ठेवून भीक मागायला सांगितलं, पोटच्या मुलांकडून संपत्तीसाठी आई-वडिलांचा छळ; वृद्ध दाम्पत्यानं जीवन संपवलं
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
Kapil Dev on farmers Suicide
Kapil Dev on farmers: कपिल देव यांचे शेतकऱ्यांना आवाहन; म्हणाले, “तुमच्या आत्महत्येमुळे आम्हाला…”
Mercedes-Benz, Supriya Sule, Supriya Sule latest news,
मर्सिडिज बेंझला नोटीस देण्याच्या टायमिंगवर शंका; खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शासनाने…”
MP supriya sule criticize deputy cm ajit pawar in pimpri chinchwad
सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला… म्हणाल्या, “पिंपरी- चिंचवडचा कारभारी वेगळा होता म्हणून…”
EY Ex Employee Exposed
EY Exposed : “४०० इमेल्स पाठवले, पण तरीही प्रमाणपत्र दिले नाहीत”, EY च्या माजी कर्मचाऱ्याचा खुलासा; म्हणाले…
Protest broke out at the Bengaluru college after the recording incident came to light
कॉलेजच्या बाथरूममध्ये महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड करायचा, रंगेहाथ पकडल्यावर म्हणाला…
Fake blood donation by bjp leader
भाजपा नेत्याची चमकोगिरी; मोदींच्या वाढदिवसानिमित्त केलं बोगस रक्तदान, व्हिडीओ व्हायरल होताच म्हणाले…

हेही वाचा : “झापुक झुपूक बच्चा…”, Bigg Boss विजेत्या सूरजची डायलॉगबाजी ऐकून अजित पवारांना हसू अनावर; व्हिडीओ व्हायरल

सूरज चव्हाणची चाहत्यांसाठी पोस्ट

सूरज ( Suraj Chavan ) पोस्टमध्ये लिहितो, “नमस्ते मी आपल्या महाराष्ट्राचा लाडका सूरज चव्हाण. मागील काही तासांपासून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत असून, त्यामध्ये आम्ही सूरजला आर्थिक मदत करणार आहोत…दिलेला कोड स्कॅन करून पैसे पाठवा. त्याच्यापर्यंत निश्चित ही आर्थिक मदत आम्ही पोहोचवू… अशा पद्धतीच्या या सगळ्या पोस्ट आहेत. माझ्या नावाचे फेक आयडी बनवून या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. तरी अशा फेक पोस्टला फॅन्सनी बळी पडू नये ही माझी विनंती आहे. जे कोणी अशा पोस्ट शेअर करत आहेत…त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.”

हेही वाचा : “लल्लाटी भंडार…”, गाण्यावर नारकर जोडप्याचा जबरदस्त डान्स! दोघांच्या एनर्जीचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक, पाहा व्हिडीओ

Suraj Chavan
सूरज चव्हाणची चाहत्यांसाठी पोस्ट ( Suraj Chavan )

दरम्यान, सूरज चव्हाणचं ( Suraj Chavan ) बालपण अत्यंत बेताच्या परिस्थितीत गेल्यामुळे त्याला शिक्षण पूर्ण करता आलेलं नाही. त्यामुळे वैयक्तिक आयुष्यात सुद्धा अशा अनेक फसवणुकींच्या घटनांचा त्याला सामना करावा लागला. यामुळे ग्रँड फिनाले संपल्यावर रितेशने सूरजची भेट घेऊन त्याला मदतीसाठी मॅनेजर देणार असं सांगितलं होतं. याशिवाय सूरजने उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतल्यावर त्यांनी सुद्धा त्याला “शिक्षण पूर्ण कर, बँकेत खातं उघड” असा सल्ला दिला आहे. सध्या सूरजची लोकप्रियता लक्षात घेऊन त्याच्याबरोबर पूर्णवेळ त्याचे मित्रमंडळी व हितचिंतक असतात.