Happy Birthday Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे घराघरांत लोकप्रिय सूरज चव्हाण आज त्याचा ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. गेल्या ३ महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांनी या ‘गुलीगत किंग’ला भरभरून प्रेम दिलं. याच सर्व रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळे सूरजला यंदा ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरता आलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूरजचा ( Suraj Chavan ) ट्रॉफी जिंकण्याचा त्याचा प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीच्या काळात त्याला ‘बिग बॉस’चा खेळ देखील नीटसा समजत नव्हता. अशा कठीण काळात पंढरीनाथ कांबळेने पहिल्या दिवसापासून त्याला खंबीरपणे साथ दिली. ‘बिग बॉस’च्या घरात सूरज त्याला ‘पॅडी दादा’ अशी हाक मारायचा. हा शो संपल्यावर नुकतीच या दोघांची पुन्हा एरदा भेट झाली. यावेळी सूरज आणि पंढरीनाथने एकमेकांना कडकडून मिठी मारल्याचं पाहायला मिळालं.

लाडक्या मित्राला मिळणारं यश पाहून पॅडीला अभिमान वाटला आणि त्याचे डोळे पाणावल्याचं अभिनेत्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. आज सूरजच्या वाढदिवसानिमित्त पंढरीनाथने भेटीच्या या गोड व्हिडीओसह सूरज चव्हाणसाठी एक भावुक पोस्ट लिहिली आहे.

हेही वाचा : Video : ‘चिकनी चमेली’ गाण्यावर रितेश-जिनिलीयाचा जबरदस्त डान्स; अवघ्या तासाभरात लाखो व्ह्यूज, नेटकरी म्हणाले, “वहिनी…”

पंढरीनाथ कांबळेची पोस्ट

प्रिय सूरज,

आपल्या आयुष्यात अनेक माणसं येत जात असतात परंतु, काही माणसं अशी येतात की, ती कायमची मनात घर करून जातात. ‘सूरज चव्हाण’ हे नाव माझ्या आयुष्यात इतकं महत्त्वाचं होऊन जाईल याचा मी स्वप्नात सुद्धा कधी विचार केला नव्हता. ‘बिग बॉस’च्या घरात असताना तुझ्याबरोबर जे काही थोडे फार क्षण मला घालवता आले ते मी कधीही विसरू शकत नाही. आपलं शिक्षण किती? आपली आर्थिक परिस्थिती काय? आपण कलाकार म्हणून कसे आहात? आपण चार चौघात कसे राहतो कसे वागतो? याचा आपण रोजच्या जगण्यात किती तरी वेळा विचार करत असतो. पण, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अक्षरशः फाट्यावर मारून तू फक्त तुझ्यातल्या ‘माणुसकीने’ संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकतोस. तेव्हा तुझ्यातल्या माणूसपणाचा हेवा वाटल्याशिवाय राहत नाही. तुला आज यशाच्या शिखरावर पाहून उर अभिमानाने भरून येतो. तू कमावलेलं हे यश आणि तू ( Suraj Chavan ) जिंकलेलं महाराष्ट्रातील प्रत्येक मन हे कायम तुझ्याबरोबर राहो, याच तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला शुभेच्छा!

तुझाच,
पॅडी दादा

हेही वाचा : Bigg Boss 18 : घरातून अधिकृतपणे पहिलं Eviction! नॉमिनेटेड १० सदस्यांपैकी कोण झालं बेघर? जाणून घ्या

दरम्यान, पंढरीनाथने शेअर केलेल्या वाढदिवसाच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी सूरजसाठी ( Suraj Chavan ) शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. याशिवाय अनेकांनी पॅडीने घरात ज्याप्रकारे सूरजला समजून घेतलं…आणि एकंदर त्याला दिलेल्या खंबीर पाठिंब्याचं कौतुक केलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suraj chavan birthday pandharinath kamble shares special post with heart touching video sva 00