Suraj Chavan हे नाव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीच्या पाचव्य पर्वाची ट्रॉफी जिंकल्यानंतर सूरजचे मोठे कौतुक होताना दिसत आहे. आता त्याच्या या विजयानंतर आईची आठवण येत असल्याचे त्याने एका मुलाखतीत म्हटले आहे.

सूरज चव्हाणने नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तू अरबाज, वैभवला टास्कमध्ये अनेकदा हरवलं आहेस. तू सगळ्यात तादकवान होतास, असे म्हटले जायचे. त्याबाबत तुला काय वाटतं, या प्रश्नावर बोलताना सूरजने म्हटले, “त्यांनी कितीही बॉडी बनवली असली तरी ही ताकद शेळीचं दूध पिऊन आलेली आहे. आप्पाकडे ५० शेळ्या होत्या. आप्पा त्यांना रानात घेऊन जायचा आणि त्या शेळ्या अशा होत्या की, आप्पा आधीच घरी आला तरीही त्या चरून मगच घरी यायच्या”, अशी आठवण सूरजने सांगितली आहे.

When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
ankita walawalkar fiance kunal express gratitude towards dhananjay powar
“दादा लग्नाला या, जोरात कानात पिळा…”, धनंजयच्या व्हिडीओवर अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याची कमेंट, आभार मानत म्हणाला…
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”
Sharad pawar on eknath shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून शरद पवारांना खुलं आव्हान, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून म्हणाले…
CM Devendra Fadnavis Answer to Sharad Pawar
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं शरद पवारांच्या पराभवाच्या गणिताला गणितानेच उत्तर; म्हणाले, “तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून…”

आईविषयी काय म्हणाला सूरज?

पुढे बोलताना त्याने, “माझी आई खूप भोळी होती. तिला पार्वती आणि बाप्पानं स्वप्नात येऊन दर्शन दिलं होतं. तिचा मुलगा साधा अन् भोळा आहे. तो सगळ्यांची मनं कशी जिंकतो हे तिला माहीत होतं. माझ्या आईची मला आठवण येते. ती आज आली असती ना, तर मी खूप नाचलो असतो. माझ्या गावात पाण्याची सोय नाही. माझी आई खूप लांबून पाणी आणायची. त्याबद्दल मला वाईट वाटतं”, असे म्हणत आईची आठवण येत असल्याचे सांगितले.

हेही वाचा: Suraj Chavan : ‘एक्स गर्लफ्रेंड परत आली तर स्वीकारणार का?’, सूरज चव्हाण म्हणाला, “बच्चाला आता…”

दरम्यान, सूरज लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला प्रसिद्धी मिळाली. कॉमेडी व्हिडीओच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता. त्याच्या वेगळेपणामुळे त्याला बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. सुरुवातीला त्याला बिग बॉसमध्ये पाहिल्यानंतर अनेकांनी ट्रोल केले मात्र सूरज चव्हाणने आपल्या साधेपणाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आणि बिग बॉस मराठी ५ चे विजेतेपद पटकावले आहे. दिग्दर्शक व कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड केदार शिंदे यांनी, त्याच्यासाठी ‘झापुक झुपूक’ चित्रपट निर्माण करणार असल्याचे म्हटले आहे. आता सूरज चव्हाणची पुढची वाटचाल कशी असणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader