Bigg Boss Marathi Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनचा खेळ सध्या अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. नुकताच घरात ‘फॅमिली वीक स्पेशल’ हा टास्क पार पडला. यावेळी प्रत्येक सदस्यांप्रमाणे सूरज चव्हाणच्या बहिणी व आत्या त्याला भेटण्यासाठी ‘बिग बॉस’च्या घरात आल्या होत्या. आपल्या बहि‍णींना पाहून सूरजच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.

‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केल्यावर अल्पावधीतच सूरजने सर्वांचं मन जिंकून घेतलं. ‘गुलीगत धोका’, ‘बुक्कीत टेंगूळ’, ‘झापुक झुपूक’ असे त्याचे सगळे डायलॉग घराघरांत लोकप्रिय झाले आहेत. सोशल मीडियामुळे सूरजचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आधी टिकटॉक आणि आता इन्स्टाग्रामवर व्हिडीओ बनवून सूरज दैनंदिन आयुष्यात कमाई करतो असं त्याने ‘बिग बॉस’च्या घरात देखील सांगितलं आहे. त्याचं शिक्षण पूर्ण झालेलं नाही, त्यामुळे अनेकदा टास्क समजून घेण्यात सूरजला अडचणी येतात पण, या सगळ्या अडचणींवर मात करत आता ‘बिग बॉस’च्या बाहेर गेल्यावर आपलं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार सूरजने केला आहे.

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Sameer Vidwans on Democracy
“समुहाने निवडून दिलेली राजेशाही…”, निवडणुकीनंतर मराठी दिग्दर्शकाची सूचक पोस्ट; म्हणाला, “लोकशाहीच्या नावाखाली…”
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण

हेही वाचा : Bigg Boss Marathi : निक्कीच्या आईने मागितली वर्षा उसगांवकरांची माफी! लेकीच्या ‘त्या’ चुकांबद्दल प्रमिला तांबोळी म्हणाल्या, “ती खरंच…”

सूरजचे कुटुंबीय ‘बिग बॉस’च्या घरात आल्यावर त्यांनी हा सोशल मीडिया स्टार कोणत्या हालाखीच्या परिस्थितीतून वर आलाय याचे किस्से अन्य सदस्यांना सांगितले. हा संपूर्ण एपिसोड सर्वांना भावुक करून गेला. याबाबत एका मराठी अभिनेत्याने पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे.

मराठी अभिनेत्याची पोस्ट

सोशल मीडियामुळे सूरजला ( Suraj Chavan ) मोठ्या प्रमाणात ओळख मिळाली. १ मिनिटांच्या एका व्हिडीओमुळे त्याचं आयुष्य बदलून गेलं ही समाजमाध्यमांची खरी ताकद आहे हे सर्वांना सूरज चव्हाणकडे पाहून लक्षात येतं. याचसंदर्भात ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात सहभागी झालेला अभिनेता अभिजीत केळकरने पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे.

“जी आर्थिक आणि सामाजिक समानता, संधी… ७५ वर्षांची आपली लोकशाही देऊ शकली नाही. ती समानता सूरजला सोशल मीडिया आणि एका रिअ‍ॅलिटी शोने दिली.” असं अभिजीतने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा : “बाईSS…”, म्हणत ‘बिग बॉस’च्या घरात आली राखी सावंत! निक्कीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला; ताज्या झाल्या ४ वर्षांपूर्वीच्या आठवणी

Suraj Chavan
अभिजीत केळकरची सूरजसाठी पोस्ट ( Suraj Chavan )

दरम्यान, सूरजने ( Suraj Chavan ) ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व जिंकावं यासाठी अनेक जण त्याला पाठिंबा देत आहेत. आता या खेळात कोण बाजी मारणार हे ६ ऑक्टोबरला पार पडणाऱ्या ग्रँड फिनाले सोहळ्यात स्पष्ट होणार आहे.

Story img Loader