Bigg Boss Winner Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण सध्या सर्वत्र चर्चेत आहे. शो संपल्यावर या कार्यक्रमातील त्याचे सहस्पर्धक सूरजला भेटण्यासाठी खास त्याच्या मोढवे गावी जात आहेत. धनंजय पोवार, वैभव चव्हाण, इरिना, जान्हवी किल्लेकर ही मंडळी दिवाळीत सूरजला भेटण्यासाठी गेली होती. आता नुकतीच ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता प्रभू वालावलकर आपल्या होणाऱ्या नवऱ्यासह सूरजला भेटून आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूरजच्या ( Suraj Chavan ) गावी गेल्यावर यापैकी काही जणांनी व्हिडीओ, फोटो शेअर केले होते. याशिवाय सूरजने देखील जान्हवी किल्लेकर, अंकिता यांच्याबरोबर फोटो-व्हिडीओ शेअर केले होते. यामध्ये जान्हवीने सूरजबरोबर गावच्या शेतात ट्रॅक्टर चालवणं असो, डीपीने सूरजच्या घरी जाऊन त्याची भेट घेणं ते अंकिताने त्याच्या रानात बसून खाल्लेली भाकरी अन् चटणी असो या सगळ्या फोटो अन् व्हिडीओजचा समावेश होता. मात्र, या सगळ्या पोस्ट आता सूरज चव्हाणच्या अकाऊंटवरून डिलीट झाल्या आहेत.

हेही वाचा : लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर

सूरजच्या अकाऊंटवरून त्याच्या जवळच्या मित्रमंडळींच्या पोस्ट डिलीट कशा झाल्या? अशा चर्चा सोशल मीडियावर रंगलेल्या असतानाच या संपूर्ण प्रकरणावर सूरजच्या टीमने इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत स्पष्टीकरण दिलं आहे. सूरजचं शिक्षण पूर्ण झालेलं नसल्याने त्याची सोशल मीडिया अकाऊंट्स त्याचा भाचा व काही जवळचे मित्र हाताळतात. या टीमने पोस्ट शेअर करत सूरजच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचा प्रॉब्लेम झाल्याची माहिती दिली आहे.

सूरज चव्हाणची पोस्ट

नमस्कार मी आपल्या सर्वांचा, महाराष्ट्राचा लाडका सूरज चव्हाण. माझ्या इन्स्टाग्राम अकाऊंटचा काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे काही अत्यंत महत्त्वाच्या पोस्ट्स डिलीट झाल्या आहेत. त्यामध्ये माझ्या अंकिता ताई आणि जान्हवी ताईच्या पण पोस्ट होत्या. यापुढे मी स्वत: लक्ष देईन आणि काळजी घेईन. तर आपणा कुणाचे मन दुखावले असेल तर मोठ्या मनाने मला माफ करा! आपलाच सूरज चव्हाण!

( Bigg Boss Winner Suraj Chavan ) सूरज चव्हाणच्या इन्स्टाग्रामवरून जान्हवी व अंकिताच्या पोस्ट डिलीट

हेही वाचा : ‘सिंघम अगेन’च्या दमदार स्टारकास्टवर एकटा कार्तिक आर्यन पडला भारी! ‘भुलै भुलैया ३’ने नवव्या दिवशी कमावले तब्बल…

Bigg Boss Winner Suraj Chavan

दरम्यान, सूरज चव्हाणला ( Suraj Chavan ) काही दिवसांपूर्वी सुद्धा सोशल मीडियाचा वाईट अनुभव आला होता. त्याच्या नावे बनावट अकाऊंट्स तयार करून सूरजच्या चाहत्यांना लुबाडण्याचा प्रकार सुरू होता. ही गोष्ट समोर येताच तेव्हा देखील या ‘गुलीगत किंग’ने पोस्ट शेअर करत अशा कोणत्याच आर्थिक फसवणुकीला बळी पडू नका असं आवाहन आपल्या चाहत्यांना केलं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suraj chavan instagram account facing technical issue important post delete he apologize to fans and friends sva 00