Suraj Chavan And Ajit Pawar Viral Video : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाच्या विजेतेपदावर यंदाच्या वर्षी सूरज चव्हाणने आपलं नाव कोरलं. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आधी टिकटॉक आणि आता सध्या इन्स्टाग्रामवरील रील्समुळे हा ‘गुलीगत किंग’ घराघरांत लोकप्रिय झाला. याच कारणामुळे ‘बिग बॉस’ची टीम त्याच्यापर्यंत पोहोचली आणि त्याला शोबद्दल विचारणा करण्यात आली. आयुष्यात अनेकदा फसवणूक सहन करावी लागल्याने सुरुवातीला सूरजने या शोसाठी नकार कळवला होता. मात्र, त्याला विश्वासात घेऊन ‘बिग बॉस’च्या टीमने त्याची मनधरणी केली. परिणामी, ७० दिवसांचा हा टप्पा पार करून सूरजने विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.

सूरज चव्हाण ( Suraj Chavan ) मूळचा बारामतीचा आहे. ‘बिग बॉस’च्या घरात पहिल्या दिवसापासून “ट्रॉफी मीच घेऊन जाणार” असं सूरज म्हणत राहायचा. अखेर त्याने त्याचा प्रत्येक शब्द खरा करून दाखवला आहे. सूरजच्या विजयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोस्ट शेअर करत त्याचं कौतुक केलं होतं. यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांनी स्वत: फोन करून त्याची भेट घेतली. या भेटीदरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Groom dance in his own wedding function with his friends on zapuk zupuk song funny video goes viral on social media
“तुझ्या चिकण्या रुपड्याला मन चोरुन पाहतंय गं” नवरदेवानं मित्रांसोबत बायकोसाठी केला जबरदस्त डान्स; VIDEO झाला व्हायरल
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
anurag kashyap dance
लेकीच्या लग्नात पाहुण्यांचे स्वागत, ढोल-ताशाच्या तालावर अनुराग कश्यपचा डान्स; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
Couples unique dance
”हृदयी वसंत फुलताना..” गाण्यावर काका काकूंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “आयुष्य खूप सुंदर फक्त नवरा हौशी पाहिजे”
husband and wife conversation another woman search joke
हास्यतरंग : माझ्यासारखी…
dance in kolhapur on marathi song halagi tune
“एकदा वय निघून गेलं की हा आनंद नाही” हलगीच्या तालावर मित्रांनी धरला ठेका; VIDEO पाहून म्हणाल नादच खुळा…
kareena Kapoor
“आतापर्यंतची सर्वात कूल गँगस्टर…”, करीना कपूरच्या शर्मिला टागोरांना वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; म्हणाली, “माझ्या सासूबाईंना…”

हेही वाचा : “लल्लाटी भंडार…”, गाण्यावर नारकर जोडप्याचा जबरदस्त डान्स! दोघांच्या एनर्जीचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक, पाहा व्हिडीओ

Bigg Boss विजेत्या सूरज चव्हाणची डायलॉगबाजी

सूरज ( Suraj Chavan ) ‘बिग बॉस’ची ट्रॉफी घेऊन अजित पवार यांच्या भेटीला गेला होता. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी त्याची विचारपूस केली. घरात कोण-कोण असतं? कमाईचं साधन, बिग बॉसची ऑफर या सगळ्या गोष्टी त्यांनी सूरजला विचारल्या. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार होत असताना सूरजने मोठ्या उत्साहात त्याची डायलॉगबाजी सुरू केली.

‘बिग बॉस’च्या घरात सूरज ( Suraj Chavan ) सतत “झापुक झुपूक बच्चा…”, “गुलीगत किंग”, “बुक्कीत टेंगूळ” अशी डायलॉगबाजी करायचा. अजित पवारांसमोर देखील त्याने हे सगळे डायलॉग म्हणून दाखवले. सूरजची ही डायलॉगबाजी ऐकून त्यांना हसू अनावर झालं होतं. यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी सूरजचं कौतुक करत त्याला काही मोलाचे सल्ले दिले.

हेही वाचा : Video : बाबा सिद्दीकींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी सलमान खान पोहोचला; भाईजानचा ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले…

दरम्यान, सूरजचं घर अतिशय लहान आहे. त्यामुळे त्याला गावात घर बांधून द्या अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत. त्यामुळे सूरजने देखील त्यांचे आभार मानले.

Story img Loader