Suraj Chavan Video: ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व संपून जवळपास एक महिना झाला आहे. पाचव्या पर्वाचा विजेता रीलस्टार सूरज चव्हाण पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. तो त्याचे मजेदार, विनोदी रील्स इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करत असतो. असेच एक रील त्याने आता पोस्ट केले आहे, त्याच्या या रीलवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूरजने हातात गुलाबाचं फूल घेऊन हा व्हिडीओ शूट केला आहे. ‘वाढदिवसाला नको प्रेझेंट मला’ या गाण्यावर सूरजने रील बनवलं आहे. काहींना त्याचं हे रील खूप आवडलंय, तर काहींनी त्याला चांगला विनोदी कंटेट बनवायला हवा अशा कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापची पत्नी काय काम करते? प्राजक्ताचे शिक्षण किती? म्हणाली, “मी ९ वर्षांपासून…”

सूरज चव्हाणचा व्हिडीओ –

सूरजच्या या व्हिडीओवर ‘भाऊ आता नाय ऐकत’, ‘भाऊ जोमात पोरी कोमात’, ‘सूरज भाऊ तू असे व्हिडीओ नको बनवत जाऊ, आता जरा चांगल्या डान्स स्टेप्स शिकून घे, आता आमच्या खूप अपेक्षा आहेत तुझ्याकडून, कॉमेडी कंटेंट देत जा, तुझ्या आवाजात खूप ताकद आहे’, ‘आता खरा हिरो दिसतोय सूरज चव्हाण’, ‘भाऊ लवकरच मंडपात,.. उभा राहतोय वाटतं’, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

सूरज चव्हाणच्या व्हिडीओवरील कमेंट्स
सूरज चव्हाणच्या व्हिडीओवरील कमेंट्स

हेही वाचा – Singham Again vs Bhool Bhulaiyaa 3 : ‘सिंघम अगेन’ने बॉक्स ऑफिसवर मारली बाजी, पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

बारामतीजवळच्या मोढवे गावात जन्मलेला सूरज चव्हाण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मोठा झाला. तो लहान असताना त्याचे वडील कॅन्सरने वारले, त्यानंतर त्याच्या आईचंही निधन झालं. रोजमजुरी करून तो जगत होता. त्यानंतर तो सोशल मीडियावर रील बनवू लागला. याच दरम्यान त्याला बिग बॉसची ऑफर आली आणि ७० दिवसांच्या प्रवासानंतर तो बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता ठरला, त्यानंतर तो आता त्याची स्वप्ने पूर्ण करत आहे. नुकतंच त्याच्या घराच्या बांधकामासाठी भूमीपूजन झालं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suraj chavan new reel on trending song netizens says learn good dance steps hrc