Nikki Tamboli Arbaz Patel: बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 5) पर्वात निक्की व अरबाज पटेल यांची जवळीक खूप चर्चेत राहिली. मागच्या आठवड्यात अरबाज घराबाहेर पडला, तेव्हा निक्की खूप रडली होती. त्यानंतर फॅमिली वीकमध्ये तिची आई घरात आली आणि आईने अरबाजबद्दल काही गोष्टीन निक्कीला सांगितल्या. त्यानंतर निक्की भडकली आणि आता ती काहीशी गोंधळलेल्या अवस्थेत आहे. आजच्या भागात निक्की व सूरज याच विषयावर बोलताना दिसले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अरबाज कमिटेड आहे, त्याची इंगेजमेंट झाली आहे, अशा गोष्टी बोलल्या जात आहेत. अरबाजची आई म्हणते की त्याने आधी दोन शो केलेत, त्या दोन मुली त्याच्या मागे आहेत, त्यात आता तू तिसरी. अरबाजच्या घरच्यांना त्रास होतोय, लोक नाव ठेवतात, असं प्रमिला तांबोळी आपल्या लेकीला म्हणाल्या होत्या. त्यानंतर निक्की भडकली आणि अरबाज-निक्कीचं जे होतं ते संपलं, असं म्हणत तिने अरबाजचे कपडे एका पिशवीत भरून स्टोअर रुममध्ये ठेवले. ते कपडे फेकून द्या, असं ती बिग बॉसला म्हणाली. त्यानंतर आज सूरज व निक्की यावर चर्चा करताना पाहायला मिळाले.
सूरजचा निक्कीला सल्ला
सूरज निक्कीला म्हणाला, “तुझ्या डोक्यात आहे ना जे, ते सगळं बाहेर फेकून दे.” यावर निक्की म्हणते “फेकलं जात नाहीये.” सूरज म्हणाला, “फेक ना ते बाहेर, असं कसं चालेल. तुलाच त्रास होईल मग.” निक्की म्हणते “हो त्रास तर होतोय.” सूरज म्हणाला, “तो १० मुली फिरवेल, तुझं काय? त्याची आई काय म्हणाली ते माहितीये ना, दोन पोरी त्याच्या घरी आल्या होत्या. आता तू तिसरी. असंच असतं पोरांचं. प्रेम कसं असावं माहितीये का? एकीवरच असावं आणि जीवापाड असावं.” निक्की म्हणते खरंय. सूरज म्हणतो, “त्यांचं मन भरलं की सोडायचं, ते मला फार खटकतं. डोक्यात बाटल्या वगैरे फोडू वाटतं.” निक्की म्हणाली, “मलाही तसंच होतंय.”
अरबाज पटेलचं ब्रेकअप! घराबाहेर आल्यावर ‘ती’ कमिटमेंट मोडली; स्वत:च खुलासा करत म्हणाला…
मी भावनांशी खेळत नाही – निक्की
पुढे सूरज म्हणतो, “त्यांनीही आपल्याला जीव लावलेला असतो. तू डोक्यातलं काढून टाक नाहीतर तुलाच त्रास होणार आणि तुझं त्यातच लक्ष असेल. आपले मम्मी पप्पा सांगतात, त्यांचं ऐकायला पाहिजे आपण. ते देव आहेत आपले, हे कोण आहे? तू जन्म घेतलाय तिच्या पोटातनं.” निक्की म्हणाली, “त्यांचं तर मी ऐकलंच म्हणून तर मला त्रास होतोय ना की त्याने मला सगळं खरं का नाही सांगितलं. मी पोरांना असं फिरवते, पण असं कधीच करत नाही. भावनांशी खेळत नाही.”
हेही वाचा – Bigg Boss Marathi: “माझा साखरपुडा…”, निक्कीच्या आईच्या वक्तव्यावर अरबाज पटेलची पहिली प्रतिक्रिया
सूरजने निक्कीला थेट विचारलं, “त्याच्यावर प्रेम करते का तू?” निक्की म्हणाली, “तो मला आवडायचा.” सूरज म्हणाला, “तुला वाटत होतं तो तुझ्यासाठी खूप करतोय.” निक्की म्हणते, “पण तो करत होता. काय होतं मग ते.” सूरज म्हणाला, “तुझ्याबरोबर पुढे जायचं होतं. मला तर तुझंच फार प्रेम आहे असं वाटलं.” निक्की म्हणाली, “हो.. मी दाखवलं नाही यार.” सूरज म्हणतो “त्याने तुला असंच सोडून दिलं होतं. तू पडली, रडली, त्याने डोळ्यातून पाणी आणलं का? गेला बाहेर.” निक्की म्हणाली, “तेच मला आश्चर्य वाटलं की मी इतकी ढसाढसा रडत होते आणि त्याच्या डोळ्यात अश्रू फक्त बाहेर जाताना आले होते.” सूरज म्हणतो, “तुला त्रास दिला, पागल करून, तेरे नाम करून गेला.”