सूरज चव्हाण (Suraj Chavan) हे नाव आज सर्वांना परिचित आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या हटके आणि विनोदी कंटेंटमुळे त्याच्या फॉलोअर्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. अनेकदा त्याला ट्रोलदेखील करण्यात आले. सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर म्हणून त्याची ओळख निर्माण झाल्यानंतर त्याला बिग बॉस मराठी ५ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होण्याची संधी मिळाली. बिग बॉसच्या घरातून त्याने आपल्या स्वभावाने, खेळाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. बिग बॉस मराठी ५ व्या पर्वाचा सूरज चव्हाण विजेता झाला.
हातात बिग बॉसची ट्रॉफी बघून वडिलांची ‘अशी’ असती प्रतिक्रिया
सूरज चव्हाणने नुकतीच ‘अल्ट्रा मराठी बझ’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला विचारले की, आज तुझे आई-वडील असते आणि तुझ्या हातात बिग बॉस मराठीची ट्रॉफी त्यांनी पाहिली असती, तर त्यांची प्रतिक्रिया काय असती. यावर बोलताना सूरज चव्हाणने म्हटले, “आज जरी ते नसले तरी त्यांचा माझ्याबरोबर आशीर्वाद आहे. ते माझ्याजवळच आहेत. त्यांच्या लेकावर त्यांचं लक्ष आहे. ते मला सोडून कुठेच जाणार नाहीत. मी एकदिवस बहिणीकडे गेलो तर मला राहवत नाही. माझ्या घरी मी कधी जातोय, असं मला वाटत राहतं. बिग बॉसच्या घरातसुद्धा मी म्हटलेलो की, मला माझं गाव महत्त्वाचं आहे. गावाशिवाय मला एक दिवस करमत नाही. माझा आप्पा गावात जाऊन सगळ्यांना उठवून म्हटला असता, बघा माझ्या लेकाने काय केलंय; अख्ख्या बारामतीचं नाव मोठं केलंय.”
सूरज चव्हाणने याआधी अनेकविध मुलाखतींतून त्याच्या कुटुंबाविषयी, घरच्या परिस्थितीवर भाष्य केले आहे. तो लहान असताना त्याच्या आई-वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्याला आणि त्याच्या बहिणींना संकटांचा सामना करावा लागला. त्याच्या बहिणींनी त्याचा सांभाळ केला. त्या त्याच्यासाठी आईसारख्याच असल्याचे त्याने मुलाखतींमध्ये म्हटले आहे. भविष्यात पुढे चित्रपटांत काम करणार आणि खूप मोठा हिरो होणार, हा माझा शब्द आहे, असेही सूरज चव्हाणने या मुलाखतीत म्हटले आहे.
दरम्यान, सूरज चव्हाणला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेक्षकांचे प्रेम मिळत असल्याचे दिसते. सूरज चव्हाण या पर्वाचा विजेता ठरल्यावर कलर्स मराठीचे प्रोग्रामिंग हेड आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरजची प्रमुख भूमिका असलेला ‘झापुक झापूक’ या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याचे म्हटले आहे. सध्या सूरज सोशल मीडियावर रील आणि व्हिडीओच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसतो. आता त्याला चित्रपटात पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे म्हटले जाते.