Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठीच्या नवव्या आठवड्यात घरातील सर्वच आठ सदस्य नॉमिनेटेड होते. सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, पंढरीनाथ कांबळे, अंकिता वालावलकर, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर या सर्व स्पर्धकांपैकी पंढरीनाथ एलिमिनेट झाला. त्याच्यासाठी सूरज चव्हाणने केलेली पोस्ट चर्चेत आहे.

आठ सदस्यांपैकी सर्वात कमी मतं पंढरीनाथ कांबळेला मिळाली आणि तो ग्रँड फिनाले अवघ्या एका आठवड्यावर असताना घरातून बाहेर पडला. एलिमिनेट झाल्यावर त्याने म्युचुअल फंड्सचे कॉइन्स सूरजला दिले. या शोच्या पहिल्या दिवसापासून पॅडीने सूरजला सांभाळून घेतलं. सूरजला वाचता-लिहिता येत नाही, त्यामुळे त्याला टास्क समजावून सांगणं, त्याचा अडचण येत असेल तिथे मदत करणे या सगळ्या गोष्टी पंढरीनाथने केल्या. पंढरीनाथ गेल्यावर सूरजने भावुक पोस्ट केली आहे.

“मी सूरजचं पालकत्व…”, घराबाहेर जाताना पंढरीनाथ कांबळेने सांगितला मोठा निर्णय; सर्वत्र होतंय कौतुक

Suraj Chavan post for Pandharinath Kamble : सूरजच्या अकाउंटवरून पंढरीनाथचा एलिमिनेशन व घरातून बाहेर पडतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. “माझा देव.. पॅडी दादा… माझी काळजी करणारा.. माझा संभाळ करणारा, मला समजून सांगणारा … मला कधीच घरच्यांची उणीव न भासू देणारा.. आज आमच्यापासून, बिग बॉसमधून बाहेर गेले. पण तुम्ही माझ्या काळजात आयुष्यभर राहणार आणि तुमची इच्छा मी पूर्ण करणार. मी ट्रॉफी घेऊनच येणार.. मिस यू, लव्ह यू,” अशी पोस्ट सूरजच्या अकाउंटवरून करण्यात आली आहे.

पाहा पोस्ट –

“रसिक मायबाप प्रेक्षकांनी…”, घराबाहेर आल्यावर पंढरीनाथ कांबळेची पहिली पोस्ट; नेटकरी म्हणाले, “दादा Unfair…”

बिग बॉसच्या घराबाहेर पडलेल्या पंढरीनाथ कांबळेचे नेटकरी खूप कौतुक करत आहेत. “फक्त इथेच नाहीतर मी त्याचं पालकत्व आता आयुष्यभरासाठी घेतलंय,” असं जाता जाता पंढरीनाथ म्हणाला. त्याच्या या वक्तव्याचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

Bigg Boss Marathi : निक्की तांबोळी सुरक्षित होताच अरबाज पटेलची प्रतिक्रिया, म्हणाला…

बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व १०० दिवसांऐवजी ७० दिवसांत प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. ६ ऑक्टोबर रोजी या शोचा ग्रँड फिनाले होणार आहे. घरातील सात सदस्यांपैकी ट्रॉफी कोण जिंकणार, हे रविवारी स्पष्ट होईल.