Bigg Boss Marathi Winner Suraj Chavan : ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनमध्ये यंदा सूरज चव्हाणने बाजी मारली. गेल्या तीन-चार महिन्यांपासून या ‘गुलीगत किंग’ला महाराष्ट्राच्या जनतेकडून भरभरून प्रेम मिळालं. ‘बिग बॉस’मुळे त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. यंदा घरात एकूण १७ सदस्यांनी प्रवेश घेतला होता. आता शो संपल्यावर सगळे सदस्य पुन्हा एकदा आप-आपल्या कामावर परतले आहेत.
सूरज ( Suraj Chavan ) हा मूळचा मोढवे गावचा आहे. ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केल्यापासून त्याने पहिल्या दिवशीच ‘मी ट्रॉफी जिंकणार’ असा दृढ निश्चय केला. अगदी पहिल्या दिवशी केलेल्या वक्तव्याप्रमाणे सूरजने या खेळात बाजी मारली. शो जिंकल्यावर त्याला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या आहेत. ‘कलर्स मराठी’चे प्रोग्रामिंग हेड आणि लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे सूरजला बरोबर घेऊन ‘झापुक झुपूक’ सिनेमा देखील बनवणार आहेत.
आता शो संपल्यावर आता सूरज ( Suraj Chavan ) पुन्हा एकदा आपल्या कामावर परतला आहे. सोशल मीडियावर विविध व्हिडीओ शेअर करत आणि वेगवेगळी डायलॉगबाजी करत आपल्या चाहत्यांचं मनोरंजन करणं यामुळे सूरज खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाला होता. तसेच बालपण खेडेगावात गेल्याने माझं मन सर्वात जास्त गावी रमतं असंही त्याने अनेकदा ‘बिग बॉस’च्या घरात म्हटलं होतं. यानुसार हा ‘बिग बॉस’ विजेता आता गावच्या शेतात रमल्याचं पाहायला मिळत आहे.
सूरज चव्हाणने गावाकडच्या शेतात फेरफटका मारतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात तो ट्रॅक्टर चालवत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कमेंटचा पाऊस पाडला आहे.
हेही वाचा : विशाखा सुभेदारच्या परदेशी गेलेल्या लेकाने पहिल्यांदाच बनवले लाडू! अभिनेत्रीच्या डोळ्यात आनंदाश्रू; म्हणाली, “मी घरी नसूनही…”
“गावरान मुंडे”, “खरंच हिरो वाटतो सूरज दादा”, “झापुक झूपुक गावरान मुंडे”, “सूरज स्टाइल एक नंबर”, “सूरज भाऊने ट्रॅक्टरवर व्हिडिओ काढला” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी सूरजच्या ( Suraj Chavan ) व्हिडीओवर करत त्याचं कौतुक केलं आहे. अवघ्या दोन तासांमध्ये या व्हिडीओला १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.