सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनचा विजेता झाला. सूरजच संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक झालं. आपल्या झापुक झुपुक पॅटर्नमध्ये ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर मात्र सूरज बरोबर गुलिगत धोका झाला आहे. साधा संवाद साधताना सळसळत्या ऊर्जेने बोलणारा सूरज बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर प्रचंड जल्लोष करेल अस वाटलं होत. पण ही जल्लोष करण्याची, नाचण्याची संधीच न मिळाल्याचं सूरजने सांगितलं आहे.
बिग बॉसची मराठीची ट्रॉफी रितेश भाऊ (रितेश देशमुख) कडून स्वीकारल्यानंतर सूरज सध्या अनेक मुलाखती देत असून त्याच्या गावात फिरत आहे. अनेक ठिकाणी जाऊन बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतरच्या त्याच्या भावना मांडत आहे. नुकतच त्याने बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याला डान्स करण्याची खूप इच्छा होती अस सांगितल.
गाणंच लावलं नाही
सूरजने ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याचात प्रचंड उत्साह संचारला होता. सूरज म्हणतो, “जेव्हा माझ्या हातात ‘बिग बॉस’ची ट्रॉफी आली तेव्हा माझ्या अंगात प्रचंड जोश होता. मला डान्स करण्याची प्रचंड इच्छा होती पण त्यांनी गाणंच लावलं नाही.
तरीही मी नाचलो
सूरज पुढे म्हणतो बिग बॉसच्या मंचावर गाणं न लावल्याने मी नाचलो नसलो तरी भाऊंच्या धक्कयावर मी नाचलो म्हणजे मी ‘भाऊचा’ धक्का या गाण्यावर नाचलो. तो म्हणाला, “रितेश सरांचं जे गाणं आहे ना भाऊचा धक्का या गाण्यावर मी खूप नाचलो. मी बाहेर येऊन आमच्या बिग बॉसच्या भाऊचा धक्का या गाण्यावर मनसोक्त नाचलो.
सूरज दिसणार सिनेमात
सूरज सोशल मीडियावर विविध कंटेंट तयार करून लोकांचे मनोरंजन करायचा. बुक्कीत टेंगुळ, गुलिगत धोका आणि झापुक झापूक असे त्याचे स्वतःचे डायलॉग लोकप्रिय आहेत. त्याचा झापुक झुपुक हाच डायलॉग फेमस झाल्याने त्याच नावाने केदार शिंदे सिनेमा तयार करणार आहेत. सध्या सूरज त्याच्या गावी गेला असून तिथे त्याच्या चाहत्यांच्या आणि आप्त मंडळींच्या भेटी घेत आहेत.