टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री सुरभी चंदना लग्नबंधनात अडकणार आहे. तिने बॉयफ्रेंड करण शर्माशी लग्न करणार असल्याची घोषणा सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. सुरभीने इन्स्टाग्रामवर सुंदर फोटो पोस्ट करत लग्नाबद्दल माहिती दिली. १३ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडप्याने लग्नाचा निर्णय घेतला आहे.
सुरभीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करून तिच्या लग्नाची घोषणा केली आहे. तिने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत, ज्याच्या कॅप्शनमध्ये सुरभीने लिहिलं, “मी १३ वर्षांपासून त्याच्या आयुष्यात रंग भरत आहे, आता आम्ही कायमस्वरुपी एकत्र राहण्यासाठी नवी सुरुवात करतोय.” या फोटोंमध्ये सुरभी व करण एकमेकांकडे बघताना दिसत आहेत.
हेही वाचा – अंकिता लोखंडेला अभिनेत्री असूनही न चुकलेला ‘सासुरवास’
दोघेही त्यांच्या पाळीव श्वानाबरोबर पोज देताना दिसत आहेत. सुरभीची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टवर कमेंट्सचा पूर आला आहे. चाहते आणि सेलिब्रिटी या जोडप्याला त्यांच्या आयुष्यातील नवीन प्रवासासाठी शुभेच्छा देत आहेत.
‘हिंदुस्तान टाईम्स’च्या वृत्तानुसार, सुरभी चंदना आणि करण शर्मा या वर्षी मार्च महिन्यात लग्न करू शकतात. मात्र, तारीख अद्याप अधिकृतरित्या जाहीर झालेली नाही. करण शर्मा हा बिझनेसमॅन आहे. तसेच तो ‘हेवन्स’ नावाची एनजीओही चालवतो.