मनोरंजन सृष्टीतील कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्ट, तर कधी मुलाखतीदरम्यान केलेली वक्तव्ये यांमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता अभिनेत्री सुरेखा कुडची(Surekha Kudachi) यांनी एका मुलाखतीदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे त्या चर्चेत आहेत.

सुरेखा कुडची यांनी नुकतीच ‘अल्ट्रा बझ मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वातील स्पर्धकांच्या खेळावर वक्तव्य केले आहे.

काय म्हणाल्या सुरेखा कुडची?

बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झालेले कलाकार जेव्हा इतरांना वाईट बोलतात तेव्हा त्यांची प्रतिमा डागाळली जाते. या शोमधून बाहेर पडल्यावर त्या डागाळलेल्या प्रतिमेचा परिणाम त्यांच्या नंतर मिळणाऱ्या संभाव्य कामावर होईल का, या प्रश्नाला उत्तर देताना सुरेखा कुडची यांनी म्हटले, “५० टक्के परिणाम होईल; ५० टक्के कदाचित नाही होणार. कारण- हल्ली असंही होतंय की, लोक असा विचार करतात की बिग बॉसमुळे या व्यक्तीचं एवढं नाव झालंय, तर आपल्या प्रोजेक्टमध्ये घेऊ. मी तर म्हणते, आम्ही किती वर्ष काम केलंय याच्यापेक्षा मालिकांमध्येदेखील नवीन कलाकारांना किंवा ज्यांचे सोशल मीडियावर फॉलोअर्स जास्त असतील त्यांना घेतात. पण, त्यांना काम करता येतं का? तो डायलॉग पूर्ण लक्षात ठेवतो का? चुकत तर नाही ना? त्याला तांत्रिक ज्ञान किती आहे? या सगळ्यापेक्षा त्याचे फॉलोअर्स किती आहेत, हेच सध्या बघितलं जातं.”

पुढे त्या म्हणतात, “या व्यक्तींनी काम करू नये, असं माझं म्हणणं नाही; पण कलाकार म्हणून मला या गोष्टीचा त्रास होतो. बऱ्याच वेळा प्रॉडक्शन हाऊसबरोबर बोलताना पेमेंटचे जेव्हा विषय निघतात; त्यावेळी मला वाटतं की, आता जे आहेत ते दोन आणि चार रुपयांमध्ये काम करायला तयार असतील, तर ज्यांना १० आणि १५ रुपये द्यायचे आहेत, ते महागच वाटतील.”

हेही वाचा: महाराष्ट्राचा जावई आहे ‘हा’ लोकप्रिय अभिनेता, ऑन-स्क्रीन वहिनीच्या प्रेमात पडला अन् कुटुंबाचा विरोध पत्करून मंदिरात केलेलं लग्न

दरम्यान, सुरेखा कुडची बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाल्या होत्या. आता बिग बॉसच्या पाचव्या पर्वातील स्पर्धकांच्या खेळावर त्या सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसतात. आता बिग बॉसच्या घरात या आठवड्यात काय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Story img Loader