‘द कपिल शर्मा’ या कार्यक्रमाचे आज लाखो चाहते आहेत. प्रत्येक आठवड्यामध्ये या कार्यक्रमाच्या नव्या भागासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. आता या कार्यक्रमाचा नवा भाग फारच खास असणार आहे. कारण ‘द कपिल शर्मा’च्या नवीन भागामध्ये कलाकार नव्हे तर क्रिकेटपटू हजेरी लावताना दिसणार आहे. सोनी टीव्ही वाहिनीने या कार्यक्रमाच्या नव्या भागाचा मजेशीर प्रोमो सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

‘द कपिल शर्मा’मध्ये काही क्रिकेटपटू त्यांच्या पत्नीसह हजेरी लावणार आहेत. सुरैश रैना, दीपक चहर तसेच कमेंटेटर आकाश चोप्रा उपस्थित राहणार आहेत. या प्रसिद्ध व्यक्तींबरोबर त्यांच्या पत्नीही उपस्थित असतील. ‘द कपिल शर्मा’च्या नव्या प्रोमोमध्ये कपिल या सेलिब्रिटी पाहुण्यांबरोबर धमाल-मस्ती करताना दिसत आहे.

आणखी वाचा – “आज त्याच्याकडे फेम आहे पण…” एमसी स्टॅनच्या वागणुकीवर भडकले पुण्याचे गोल्डन बॉईज, म्हणाले, “गर्व…”

यावेळी कपिल सुरेश रैनाला एक मजेशीर प्रश्न विचारतो. हा प्रश्न ऐकून सगळेच जण हसू लागतात. कपिल सुरेश रैनाला विचारतो, “पत्नी स्टेडियममध्ये मॅच बघायला आली आणि तू त्याचवेळी लवकर आऊट झाला असं कधी झालंय का?”. कपिलचा हा प्रश्न ऐकून सुरेशन रैनाही हसतो. तो अगदी मजेशीर अंदाजात उत्तर देतो.

आणखी वाचा – “आता माझे वडील नाहीत पण…” आकाश ठोसरने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाला, “माझ्या आईने…”

सुरेश रैना म्हणतो, “असं सगळ्यांबरोबरच घडतं. आपला पती आज चांगली फलंदाजी करेल म्हणून पत्नी नटून-थटून, मेकअप करुन स्टेडियममध्ये येते. पण पती पहिल्याच बॉलमध्ये आऊट होतो. असं केलं तर आम्हाला जेवण तरी कसं मिळणार?”. सुरेश रैना अगदी हसत हे उत्तर देतो. कपिलसह उपस्थितही सुरशेचं हे उत्तर ऐकून पोट धरुन हसू लागतात.

Story img Loader