सातव्या मुलीची सातवी मुलगी ही टेलिव्हिजवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. अल्पवधीच या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या मालिकेत तितीक्षा तावडे, ऐश्वर्या नारकर, अजिंक्य ननावरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर अभिनेत्री सुरुची अडारकरची नुकतेच या मालिकेच एन्ट्री झाली आहे. या मालिकेत सुरुची नागीणीची भूमिका साकारत आहे.
सातव्या मुलीची सातवी मुलगीमध्ये सुरुचीच्या एन्ट्रीने मालिकेला रंजक वळण लागले आहे. नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. झी मराठीच्या इनस्टाग्राम पेजवरुन हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रमोमध्ये सुरुची नागीण अवतारात बघायला मिळत आहे. मात्र, नागीण लूकवरून प्रेक्षकांनी सुरुचीला चांगलेच ट्रोल केले आहे. एवढंच नाही तर मालिकेच्या कथानकावरुन अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काहींनी सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेची एकता कपूरच्या मालिकेशी तुलना केली आहे. तर अनेकांनी सुरुचीच्या अभिनयावरच टीका केली आहे. एकाने कमेंट करत लिहिले ‘या सिरीयलला नागीणचा लूक का दिला आहे. कसली फालतू अॅक्टिंग दिसतेय सुरुचीची’. तर दुसऱ्याने ‘किती फालतू सिरीयल आहे बंद करा’ अशी कमेंट केली आहे. तर आणखी एकाने ‘हसायला येतंय’ असे म्हणत कमेंट केली आहे. तर तिसऱ्याने काय तमाशा लावलाय हा….. लॉजिक…??अशी कमेंट केली आहे. तर काहींनी मालिकेच्या वीएकएक्सची खिल्ली उडवली आहे.
हेही वाचा- ‘तू चाल पुढं’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप, ‘या’ दिवशी प्रसारित होणार शेवटचा भाग
सुरुचीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ‘का रे दुरावा’ या मालिकेतून सुरुची घराघरांत पोहचली. या मालिकेत तिच्याबरोबर सुयश टिळकची मुख्य भूमिका होती. दोन वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर २०१६ साली या मालिकेने निरोप घेतला. ‘का रे दुरावा’नंतर सुरुची अनेक मालिका व चित्रपटांमध्ये झळकली. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या माध्यमातून सुरुचीने तब्बल ८ वर्षानंतर झी मराठीवर पुनरागमन केले आहे.