‘का रे दुरावा’ फेम अभिनेत्री सुरुची अडारकर आणि अभिनेता पियुष रानडे या दोघांचा विवाहसोहळा ६ डिसेंबर २०२३ रोजी थाटामाटात पार पडला. लग्नानंतर या जोडप्याचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सुरुची-पियुषच्या लग्नाला कलाविश्वातील त्यांच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती. आता लग्नानंतर आपल्या शूटिंगमधून ब्रेक काढत ही लोकप्रिय जोडी पहिल्यांदाच फिरायला गेली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुरुची अडारकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच अपडेट ती चाहत्यांबरोबर शेअर करते. अभिनेत्रीने लग्नानंतरच्या पहिल्या ट्रिपचे फोटो नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. यातील एका फोटोला अभिनेत्रीने “आता पुढे दोन दिवस हेच आमचं घर” असं कॅप्शन दिलं आहे. याचबरोबर अभिनेत्रीने स्टोरीवर नवऱ्याचा खास फोटो शेअर केला आहे. या फोटोत पियुषच्या मागे रिसॉर्टमधील सुंदर व्ह्यू पाहायाल मिळत आहे.

हेही वाचा : “ते कधीच मुलांचे मित्र झाले नाहीत”, पती ऋषी कपूर यांच्याबद्दल नीतू यांचा खुलासा; म्हणाल्या, “त्यांच्या शेवटच्या दिवसांत…”

सुरुचीने लग्नानंतर नुकतंच एका नव्या मालिकेत पदार्पण केलं. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत सुरुची ‘सावली’ ही महत्त्वाची भूमिका साकारत आहे. तसेच पियुष कलर्स मराठी वाहिनीवर ‘काव्यांजली’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकत आहे. त्यामुळे लग्नानंतर व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत दोघेही सध्या सुंदर अशा जागी सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. कोणत्याही फोटोमध्ये अभिनेत्रीने या जागेच्या लोकेशनबद्दल माहिती दिलेली नाही.

हेही वाचा : “काही कार्यक्रमांमधून मी अत्यंत कुचका अन्…”, राज ठाकरेंच्या टोपणनावाच्या मुद्द्यावर मत मांडताना आनंद इंगळे स्पष्टच बोलले, म्हणाले…

सुरुची अडारकर-पियुष रानडे

दरम्यान, या जोडप्याच्या लग्नाला त्यांचे जवळचे नातेवाईक आणि काही मोजकेच कलाकार उपस्थित होते. त्यांच्या लग्नाबद्दल जवळचे कुटुंबीय व काही मित्र सोडून इतर कोणालाही कल्पना नव्हती. त्यामुळे सुरुचीने इन्स्टाग्रामवर अचानक शेअर केलेले फोटो पाहून तिच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suruchi adarkar and piyush ranade went for first holiday trip after marriage sva 00